मुंबई विमानतळावर 'जम्बो ब्लॉक' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी 1 फेब्रुवारीपासून आठ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे काम तीन महिने सुरू राहणार असल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणाचे वेळापत्रक विस्कळित होणार आहे. 

विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल आणि दुरुस्तीचा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2017 पासून सुरू होणार आहे. याआधी ऑक्‍टोबर 2016 मध्ये पहिल्या टप्प्यात 40 दिवसांत दुरुस्ती करण्यात आली होती. या काळात 2 हजार 100 उड्डाणे रद्द केली होती. आता दुसऱ्या टप्प्यात सकाळी 9 ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून, दरदिवशी आठ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. देशातील दुसऱ्या क्रमाकांचा सर्वाधिक व्यग्र असलेल्या या विमानतळातील मुख्य धावपट्टीवरून दररोज सुमारे 800 विमानांची ये-जा होते. मुख्य धावपट्टीला पर्याय म्हणून लहान धावपट्टीचा वापर करण्यात येईल. मात्र जम्बो विमानांसाठी ही धावपट्टी योग्य नसल्यामुळे जम्बो विमानांच्या वेळापत्रकात बदल होईल. लहान धावपट्टीच्या कमी क्षमतेमुळे दररोज 70 ते 80 विमाने रद्द झाल्यामुळे तिकीटदरावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 
 
Web Title: jumbo block on mumbai airport

टॅग्स