काय सांगता! तुमच्या आवडीची 'जंबो सर्कस' आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर; जाणून घ्या सविस्तर बातमी

मिलिंद तांबे
Sunday, 30 August 2020

देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या सर्कशीचा आनंद लवकरच डिजीटल प्लॅटफॉर्मवर घेता येणार आहे. रँबो सर्कस व्यवस्थापनाने 'लाईफ इज ए सर्कस' नावाचा ऑनलाईन शो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई : देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या सर्कशीचा आनंद लवकरच डिजीटल प्लॅटफॉर्मवर घेता येणार आहे. रँबो सर्कस व्यवस्थापनाने 'लाईफ इज ए सर्कस' नावाचा ऑनलाईन शो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 'सेव्ह दी सर्कस' अशी साद घालत सर्कसमधील कलाकारांनी सर्कस प्रेमींना मदतीचे आवाहन केले आहे. 

'ऑड टू दी ग्रेटेस्ट शोमॅनशसिप' या थिमसह हा शो लाँच करण्यात येणार आहे. यात अनेक हवाई कसरती पाहायली मिळतील. संपूर्ण कौटूंबिक मनोरंजन करणारा हा शो असेल असे सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे सर्कस क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला. यातून पुन्हा उभे राहणे महत्वाचे आहे. त्यामुळेच आम्ही रँबो सर्कसचा ऑनलाईल शो आयोजित करण्याचा निर्णय घेतला, असे रँबो सर्कसचे मालक सुजीत दिलीप यांनी सांगितले.  

मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही! वांद्रे, कुलाब्यात कोरोना संसर्गात वाढ; उत्तर मुंबईची परिस्थिती जैसे थे

काही वर्षांपूर्वी सर्कस हा मुलांसाठी तसेच कूटूंबासाठी सर्वात आवडीचे मनोरंजनाचे साधन होते. 80-90 च्या दशकात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सर्कशी जोडलेल्या काही ना काही आठवणी आहेत. कोरोनामुळे अनेक मर्यादा आल्या आहेत. मात्र, प्रत्येक ऑनलाईन सर्कस हुबेहुब जिवंत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यामुळे ती प्रेक्षकांना आवडेल, अशी अपेक्षाही दिलीप यांनी व्यक्त केली. 
ऑनलाऊन तिकीटातून जे पैसे उभे राहतील ते सर्कसमध्ये काम करणा-या कलाकार तसेच कामगारांना दिले जाणार आहेत. तातडीने लॉकडाऊन संपून पुन्हा सर्कस सुरू होण्याची शक्यता नसल्याने केवल वाट पाहणे ऐवढेच शिल्लक आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली होती, असे दिलीप सांगतात.

61 जणांची जेवणाची भ्रांत
लॉकडाऊनच्या केवळ आठवडाभर आधी आम्ही मुंबईत दाखल झालो. केवळ सहा शो झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे सर्कस बंद करावी लागली. सर्कशीत कलाकार तसेच कामगार मिळून एकूण 61 हून अधिकजण काम करतात. त्यांचे जगणे आता अवघड झाले आहे. आमच्यासाठी एकवेळच्या जेवणाची भ्रांत झाल्याचे सर्कसीतील कलाकार विजू पुश्कान यांने सांगितले.

अरे व्वा ! ठाण्याच्या मधुरिका पाटकर हिला अर्जुन पुरस्कार जाहीर - 

सामाजिक संस्थेची मदत
गेल्या पाच महिन्यात एकही खेळ झालेला नाही. पुढे काय करायचे हा प्रश्न होता. जवळचे सर्व पैसे केव्हाच संपले होते. चहा पिऊन दिवस काढावे लागत होते.  अशाच प्रकारे चहा घेत असताना आमची अडचण काही सामाजिक संस्था चालकांच्या लक्षात आली. त्यांनी आम्हाल मदत करायचे ठरवले. शूटींगसाठी लागणारे सर्व सामान तसेच कामगार त्यांनीच पुरवल्याचे  सर्कसचे मालक सुजीत दिलीप यांनी सांगितले.

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे  )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jumbo Circus now on online platform; Learn detailed news