मुंबई : जुना पत्री पुल वाहतूकीस बंद

Juna patri bridge in mumbai is closed for vehicle
Juna patri bridge in mumbai is closed for vehicle

मुंबई - मुंबईतील गोखले पुल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याणातील जुना पत्री पुल अवजड वाहनांच्या वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. रेल्वेने फेब्रुवारी 2018 मध्ये एका पत्राद्वारे हा पुल वाहतुकीस बंद करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिल्या होत्या. त्यावर चार महिन्यांनंतर ठाणे वाहतूक शाखेने हा पुल अवजड वाहनांच्या वाहतूकीस बंद करण्यात आल्याची अधिसूचना काढली.

मध्य रेल्वेच्या उप विभागीय व्यवस्थापक कार्यालयाने महामंडळाला एका पत्राद्वारे लवकरात लवकर जुना पत्री पुल अवजड वाहनांच्या वाहतूकीस 
धोकादायक असल्याचे कळवले होते. हा पुल 1914 मध्ये उभा करण्यात आला होता. आता त्याचे आर्युमान संपले असल्याने यावरुन अवजड वाहनांची वाहतूक धोकादायक ठरु शकते असे या पत्रात म्हटले आहे. पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले लोखंड गंजले आहे, तसेच त्याचा ढाचा खिळखिळा झाला असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील दुर्घटनेनंतर कारवाई करत ठाणे वाहतूक शाखेने अधिसूचना जारी करत हा पुल बंद केला. या पुलावरुन लहान वाहनांच्या वाहतूकीस मात्र परवानगी देण्यात आली आहे. 

अधिसूचनेनुसार रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत नव्या पत्री पुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक करण्यास परवानगी आहे. मात्र यामुळे कल्याण शहरातील वाहतूकीस अडचणी येण्याची शक्यता आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मुंब्रा बायपास बंद असल्याने अनेक अवजड वाहने सध्या कल्याणमार्गे जात आहेत. आता या पुलावर फक्त रात्री वाहतूक करण्याची परवानगी असल्याने शहरात वाहनांच्या रांगा लागण्याची भीती आहे.         
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com