काळा घोडा फेस्टिवल २ फेब्रुवारीपासून

काळा घोडा फेस्टिवल २ फेब्रुवारीपासून

मुंबई - काळा घोडा कला महोत्सव हा कला व संस्कृतीची तब्बल दोन दशके साजरी करत आहे. २ ते १० फेब्रुवारीदरम्यान काळा घोडा महोत्सव डिझाईन, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य आणि अनेक विविध प्रकारांतून महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती आहे.

त्यानिमित्ताने गांधीजींनी देशासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाला या फेस्टिवलमधून मानवंदना देण्यात येणार आहे.

जहांगीर आर्ट गॅलरीमधील विशेष प्रदर्शन, तसेच संगीत, नृत्य, साहित्य, नाटक व अनेक प्रकारांतून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे, अशी माहिती ‘काळा घोडा असोसिएशन’चे अध्यक्ष मनेक दावर यांनी दिली. तसेच फेस्टिवलतर्फे मानाच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात येणाऱ्या मोहक प्रदर्शनात महात्मा गांधींची सर्वोत्तम संकलित चित्रे; तसेच बॉम्बे हेरिटेजचे ऐतिहासिक संकलनही येथे मांडण्यात येईल. अधिक माहिती  www.kalaghodaassociation.com या संकेतस्थळावरून मिळेल.

फेस्टिवलमध्ये महत्त्वाचे काय? 
     डॉक्‍युमेंट्री स्क्रीनिंग : फेस्टिवलमध्ये ख्यातनाम दिग्दर्शक खालिद मोहम्मद शहरातील इराणी कॅफे यांचा विशेष माहितीपट.
     मॅजिक ऑफ फ्ल्यूट : जागतिक कीर्तीचे बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया क्रॉस मैदानातील मंचावर उपस्थित असतील.
     अ ट्रीट फॉर द मूव्ही इन्थुझिॲसिस्ट : ‘तुंबाड’ व ‘बधाई हो’ सिनेमाच्या कलाकार आणि मंडळीशी विशेष संवाद.
     द एव्हरग्रीन शान : सुप्रसिद्ध गायक शान यांच्या तनहा दिल या गाण्यालाही या वर्षी २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ते या गाण्यासह नवी व जुनी गाणी सादर करतील.
     द नॅशनल हिरोज : २६/११ चा हल्ला आणि त्यातील वाचलेले लोक या विषयावर साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची चर्चा.
     फॉर द थिएटर लव्हर्स : नाट्य क्षेत्रातील नामांकित अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांचा खास नाटकातील प्रवेश.
    साहित्य : पुरस्कारप्राप्त लेखिका गिथा हरिहरन त्यांच्या ‘हॅव बिकम द टाईड’ या पुस्तकावर आणि लेखिका म्हणून त्यांच्या प्रवासावर बोलतील. त्यांच्या कादंबरीच्या संहितेतून सामाजिक कमजोरीबाबत त्यांची रणजित होस्कोटे यांच्याशी विविध अंगांनी चर्चा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com