Mumbai News : लालबाग हत्या प्रकरणात काळाचौकी पोलिसांच्या तपासात नवनविन माहिती उघडकीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalachowki police investigation Lalbagh murder case revealed new information crime

Mumbai News : लालबाग हत्या प्रकरणात काळाचौकी पोलिसांच्या तपासात नवनविन माहिती उघडकीस

मुंबई : लालबागमधील वीणा जैन हत्येप्रकरणी मुलगी रिम्पल जैनला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून मृत्युप्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. तपास करताना काळाचौकी पोलीस गुन्ह्याशी संबंधित व्यक्तींशी चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी या प्रकरणात संशयित अमजद या संडव्हीच विक्रेत्याशी चौकशी केली. गुन्हा उघडकीस व्हायच्या आधीपर्यंत अमजद रिंपलशी संपर्कात होता. तसेच या प्रकरणात मेडिकल स्टोअर चालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. या तपासात पोलिसांसमोर धक्कादायक माहिती समोर येत आहे.

आईच्या वर्तनामुळे अस्वस्थ

काहीही कारण नसताना आई वारंवार टोकायची. यामुळे रिंपल अस्वस्थ झाली होती. अशात दुसरीकडे, तिच्या आईचा शिड्यांवरून खाली पडून मृत्यू झाल्याचे रिम्पलने पोलिसांना सांगितले. अशात आईचा शिड्यांवरून खाली पडून मृत्यू झाला. तेव्हा आरोपाच्या भीतीने आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा खुलासा रिम्पलने पोलिसांच्या चौकशीत केला आहे.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा असून, त्यानंतरच वीणा यांची हत्या झाली की त्या पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यूमुखी पडल्या, याची ठोस माहिती समोर येईल. दरम्यान, काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुन्हा चौकशी केली.

सँडविच विक्रेता महत्वाचा साक्षीदार

काळाचौकी पोलिसांकडून अमजद अली उर्फ बॉबीकडेही चौकशी सुरू आहे. तो लालबागमध्ये सँडविच विकण्याचे काम करायचा. रिम्पल आणि तिची आई त्याच्याकडून नेहमी सँडविच घ्यायच्या. त्यावेळी तिची अमजदशी ओळख झाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.

अमजद 7 जानेवारीला सँडविच स्टॉल बंद करून लखनौनजीकच्या आपल्या मूळ गावी गेला होता. तेव्हापासून तो रिम्पलच्या संपर्कात होता. त्यांचे चॅटिंग सुरू होते. तसेच, माटुंगा येथील एका चायनीजच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाच्याही ती सतत संपर्कात होती. या तरुणाचीही पोलिस चौकशी करत आहेत.

मेडिकल स्टोअर चालकाची चौकशी

रिम्पलने चाळीखाली असलेल्या मेडिकलमधून काही दिवसांपूर्वी फिनाइल आणि काही वस्तू मागवल्या होत्या. त्यामुळे मेडिकलवाल्याचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याचप्रमाणे 27 डिसेंबरला आई पहिल्या मजल्यावरून पडली असे रिम्पलने पोलिसांना सांगितले.

त्यावेळी चाळीखाली असलेल्या फ्लेव्हर्स ऑफ चायनीज या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या हबीब आणि रोहित या दोन मुलांच्या मदतीने रिम्पलने आईला घरी आणले. त्याच दिवशी वीणा जैन यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. आता, रिम्पलनेही शिडीवरुन पडल्यानेच आईचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.

टॅग्स :Mumbai News