कळंबोलीतील इमारतींना सिडकोच्या नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

कळंबोली - येथील केएल-२ आणि केएल-४ या वसाहतींची दुरवस्था झाली आहे. धोकादायक ठरलेल्या या इमारतींतील नागरिकांना नुकत्याच नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. घरे तातडीने रिकामी करावीत, असे नोटिशीत नमूद केले आहे. इमारत पडल्यास किंवा अपघात झाल्यास त्याला सिडको जबाबदार राहणार नाही, असे सिडकोने नोटिशीत नमूद केले आहे.

केएल-दोन आणि केएल-चार या वसाहतींतील घरांचे आयुर्मान संपत आल्याने त्या राहण्यायोग्य नाहीत. गळके छपर, तडे गेलेल्या भिंती, निघालेले प्लास्टर यामुळे इमारती धोकादायक झाल्या आहेत. मोडकळीस आलेल्या या इमारतींमध्ये जवळपास १० हजार नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

कळंबोली वसाहतीत सिडकोने १९८२ मध्ये केएल टाईपच्या घरांची निर्मिती केली होती. 

घरे धोकादायक असल्याने सिडको त्यांना नोटीस देत आहे. त्यांची उलवे येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. पुनर्विकास हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाणारा निर्णय आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलता येणार नाही.
- सुनील कापसे, कार्यकारी अभियंता

Web Title: Kalamboli news CIDCO buildings

टॅग्स