प्रेयसीला जाळण्याचा प्रयत्न करणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

कळवा - प्रेयसीला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली. किरकोळ वादातून झालेल्या भांडणाच्या रागात प्रियकराने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (ता.6) घडली होती.

येथील 22 वर्षांच्या मुलीचे परिसरातीलच रामाश्रय ऊर्फ राजू पाल (वय 28) याच्याशी प्रेमसंबंध होते. ते लवकरच लग्न करणार होते; मात्र काही दिवसांपासून राजू कामासाठी जात नसल्याची माहिती या तरुणीला मिळाली होती. मंगळवारी सकाळी या तरुणीने कामावर जात नसल्याचा जाब विचारला. या वेळी दोघांत वाद झाला. राजूने तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि चुलीतून पेटते लाकूड घेऊन तिला जाळण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा करताच शेजाऱ्यांनी धाव घेत आग विझवली. पीडित तरुणीला कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: kalava mumbai news crime in mumbai