शीळ फाट्याजवळ 290 गावठी बॉंब जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

कळवा - मुंब्रा-शीळ फाटा येथे 290 गावठी बॉंबसह तरुणाला अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. 25) ही कारवाई केली. या गावठी बॉंबची दोन लाख 32 हजार इतकी किंमत आहे. प्रवीण अर्जुन पाटील (वय 34, रा. रेवस-अलिबाग) असे आरोपीचे नाव आहे. प्रवीण हा मुंब्रा- शीळ फाटा येथे गावठी बॉंब विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप बागूल यांना मिळाली होती. त्यावरून पोलिस आयुक्त परमवीर सिंग आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने सापळा रचला. प्रवीण येताच बॉंबची खात्री करण्यासाठी श्‍वानपथक बोलावण्यात आले. खात्री झाल्यावर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर रानडुकरांची शिकार करण्यासाठी हे बॉंब वापरत असल्याचे त्याने सांगितले.
Web Title: kalawa mumbai news bomb seized