कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड 45000 मतांनी पुढे Election Results 2019

कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड 45000 मतांनी पुढे Election Results 2019

कळवा मुंब्रा मतदारसंघातून NCP चे मोठे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा लीड मिळालाय. दीपली सय्यय या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. दरम्याम जितेंद्र आव्हाड हे तब्बल 45000 मतांनी पुढे आहेत.  

शरद पवारांच्या अगदी जावाचे असे जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्रा मतदार संघातून पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावतायत. अशातच शिवसेनेने अगदी शेवटच्या क्षणी एक ग्लॅमरस चेहरा म्हणून अभिमेत्री दिपाली सय्यद यांना उमेदवारी दिली.  कळवा मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनकडून ही खेळी खेळण्यात आली. त्यामुळे मुस्लीम बहुल मतदारांच्या मतदारसंघात शिवसेने दिलेल्या दिपाली सय्यद यांच्या उमेदवारीमुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठं आव्हान मिळेल असं बोललं जात होतं.    

दिपाली सय्यद 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत दीपाली सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक उपस्थित होते. यापूर्वी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अहमदनगर मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. सिनेसृष्टीत अनेक वर्ष काम करून दिपाली सय्यदने लोकांच्या मनात एक वेगळं चित्र निर्माण केलंय.  

जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड हे एक मुरलेले राजकारणी आहेत. कळवा मुंब्रा मतदारसंघात जीतेद्र आव्हाड यांनी अनेक वर्ष काम केलंय. त्यामुळे दिपाली सय्यद यांना टक्कर देण्यास आव्हाड सक्षम उमेदवार आहेत. 

WebTitle : kalawa mumbra vidhansabha constetuency trends

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com