बनावट डॉलरद्वारे दोन लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

कळवा - नवी मुंबईत महापे येथे राहणाऱ्या लिपी बबलू मुल्ला (35) या महिलेने मुंब्य्रात काही डॉलर 15 दिवसांसाठी तारण ठेवून दोन लाख रुपये उकळल्याची घटना घडली. नातेवाइकांवर उपचार करायचे आहेत, त्यामुळे पैशांची गरज असल्याचे सांगून तिने परिचयातील एका व्यक्तीचीच फसवणूक केली आहे.

मुंब्रा कोळीवाड्यात सुनील घोडके यांच्या परिचयाच्या लिपी मुल्ला हिने ती परदेशात कामाला असल्याची बतावणी केली. डॉलर तारण ठेवून तिने नातेवाइकांच्या उपचारासाठी घोडके यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले. बरेच दिवस ती परत न आल्याने घोडके यांनी परदेशी चलनाची खातरजमा केली; मात्र डॉलर बनावट असल्याचे उघड झाले. मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: kalwa news mumbai news cheating dollar

टॅग्स