कल्याणमध्ये समाजकंटकानी 7 दुचाकी पेटविल्या 

रविंद्र खरात 
बुधवार, 16 जानेवारी 2019

कल्याण - ठाण्यामध्ये दुचाकी जळीतकांड गाजत असताना कल्याण पूर्व मधील चक्कीनाका हाजीमलंग रस्त्यावरील आडवली ढोकली परिसरात गणेश चौकातील श्री. साई हिरापन्ना रेसिडीसी इमारत आज (मंगळवार) पहाटे दोनच्या सुमारास दुचाकी पेटवल्या. यामध्ये सहा ते सात दुचाकी खाक झाल्या असून, या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत 36 कुटुंब राहत आहेत. या इमारतीच्या आतमध्ये असलेल्या पार्किंगमध्ये त्या इमारती मधील नागरिक आपले वाहन पार्क करत होते. मंगळवार ता 15 जानेवारी पहाटे दोनच्या सुमारास काही समाजकंटकानी एका दुचाकीला आग लावली या आगीचा धूर एवढा होता की इमारतीच्या पहिल्या मजला पर्यंत पोहचला. हा धूर स्थानिक नागरीक अनिल म्हसकावदे यांच्या पत्नीने पाहिला आणि आपल्या पतीला सांगितले. अनिल म्हसकावदे यांनी त्वरित धाव घेतली तर पार्किंग मध्ये दोन दुचाकी जळत असल्याचे पाहिले, आणि त्वरित आपल्या इमारतीमधील नागरीकांना आवाज देऊ लागले. नागरिक आवाजाने खाली उतरले. तोपर्यंत आग वाढली होती. स्थानिकांनी एका मेकाच्या मदतीने 20 मिनिटात आग विझविली मात्र यात 7 गाड्या जळून खाक झाल्या होत्या. या घटनेमुळे स्थानिक नागरीकांत संतापाचे वातावरण असून दोषीवर कारवाई करत आमची वाहनाची भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दरम्यान स्थानिकांनी मानपाडा पोलिसांना कळविले असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत अज्ञात समाज कंटकाविरोधात गुन्हा दाखल केला. पूढील तपास सुरू असल्याचे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी सांगितले.

Web Title: In Kalyan, 7 bikes have been put on fire