मोदींच्या स्वागताला गाजराचे तोरण!

रविंद्र खरात
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (मंगळवार) कल्याणमध्ये येणार असल्याने कल्याण पूर्वमधील सामाजिक, जागरूक नागरिकांनी कल्याण पूर्वेत गाजराचे तोरण लावून जागो फडणवीस मोदी सरकार असे सांगत सर्वांचे लक्ष्य वेधले आहे.

कल्याण : कल्याण पूर्वमधील राजकीय पक्ष, नेते, नगरसेवक, सामाजिक संघटना कल्याण पूर्व मध्ये विविध विकास कामाबाबत पाठपुरावा करत असून अनेक कामे रखडलेले असून पालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याचे सांगत अनेक कामे लालफितीमध्ये अडकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (मंगळवार) कल्याणमध्ये येणार असल्याने कल्याण पूर्वमधील सामाजिक, जागरूक नागरिकांनी कल्याण पूर्वेत गाजराचे तोरण लावून जागो फडणवीस मोदी सरकार असे सांगत सर्वांचे लक्ष्य वेधले आहे.

कल्याण पूर्व मधील सिद्धार्थ नगर, गणेश मंदिर जवळून स्कायवाक आणि लोकग्रामच्या रेल्वे पुलाच्या प्रवेशद्वारावर गाजर तोरण लावून सर्वांचे लक्ष्य वेधले असून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी लक्ष्य देऊन कल्याण पूर्व मधील विविध रखडलेले कामे, समस्या दूर करून न्याय द्या अशी मागणी केली आहे.

गाजराचे तोरण, भारताच्या प्रधान सेवकाचे लक्ष वेधण्यासाठी जे केले आहे ते योग्यच आहे. लोकांनी आपला राग व्यक्त केलाय, कल्याण पुर्व अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. त्यामुळे अशा प्रकारचे उपरोधात्मक स्वागत योग्यच आहे या मागचा उद्देश एकच कल्याण पुर्वेला न्याय द्यावा अशी माफक अपेक्षा असल्याचे मत माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Kalyan citizens criticized Narenndra Modi by welcoming him with carat archway