कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत दोन दिवस पाणी बंद 

रविंद्र खरात 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

कल्याण - 2018 ला बाय बाय करण्यासाठी आगामी आठवड्यात कल्याण डोंबिवली कर नियोजनात मग्न असताना कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या आठवड्यात मंगळवार 25 डिसेंबर आणि शनिवार 29 डिसेंबर या दोन दिवशी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कल्याण डोंबिवलीकराना चांगलाच त्रास होणार असून, यापासून वाचण्यासाठी पाणी जपून वापरा असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे.

उल्हास नदी मधील पाण्याची पातळी खालावल्याने आता बारवी धरणातील पाणी साठ्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. तो पाणी साठा 15 जुलै 2019 पर्यंत वापर व्हावा यासाठी राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या आदेशनुसार कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत 21 ऑक्टोबर 2018 पासून प्रति मंगळवार 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. 

दिवसेंदिवस पाणी साठा कमी होत असून त्यासाठी अतिरिक्त 6 तास पाणी कपात करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने दिल्याने त्याधर्तीवर कल्याण डोंबिवली महानगर पालिका पाणी पुरवठा विभागाने प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याण मध्ये आल्याने हे नियोजन पुढे ढकलले होते. मात्र या आठवड्यात नियोजित मंगळवार ता 25 डिसेंबर रोजी 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून त्यासोबत शनिवार ता 29 डिसेंबर रोजी ही 24 तास पाणी बंद करून पाणी कपात करण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. सरत्या 2018 ला बाय बाय करण्यासाठी कल्याण डोंबिवली कर तयार असताना दोन दिवस पाणी येणार नसल्याने त्याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना होणार आहे. हा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी मुबलक पाणी साठा करून पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या पाणी पूरवठा विभागाने केले आहे.

Web Title: Kalyan Dombivali Municipal Corporation closed for two days