'केडीएमसी'तील चुकार अधिकाऱ्यांची गय नाही: आयुक्त पी. वेलरासु

रविंद्र खरात 
रविवार, 16 जुलै 2017

कल्याण डोंबिवली महानगर पालिका अधिकारी आपल्या मर्जीनुसार कामावर येत असल्याचे समोर आले. पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्या दालनात सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक शनिवारी सकाळी साडे दहा वाजता सुरु होणार होती, मात्र आयुक्त आले तरीही काही अधिकारी बैठकीला आले नाही तब्बल 15 मिनिट उशिरा बैठक सुरु झाली.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका अधिकारी वर्गाच्या शनिवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये अधिकारी उशिरा आले, तर काहीनी दांडी मारल्याने पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी चांगलीच दखल घेत गैरहजर राहणाऱ्या अधिकारी वर्गाला कारणे दाखवा नोटिस बजावा तर कामचुकार अधिकारी वर्गाची गय केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका अधिकारी आपल्या मर्जीनुसार कामावर येत असल्याचे समोर आले. पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्या दालनात सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक शनिवारी सकाळी साडे दहा वाजता सुरु होणार होती, मात्र आयुक्त आले तरीही काही अधिकारी बैठकीला आले नाही तब्बल 15 मिनिट उशिरा बैठक सुरु झाली. उशिरा येणाऱ्या अधिकारी वर्गाची चांगलीच हजेरी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी घेत वेळेचे भान ठेवा, कामचुकार अधिकारी वर्गाची गय केली जाणार नाही. पालिकेच्या तिजोरीत पैसा नाही तर कामे का घेता असा सवाल करत, कामांचा दर्जा क़ाय? मला कामांचा दर्जा हवा, असा सज्ज्ड दम पालिका अधिकारी वर्गाला पालिका आयुक्त वेलरासु यांनी दिल्याचे समजते. यामुळे पालिका अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

पालिका आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर प्रत्येक विभागाची बैठक घेत समस्या जाणून घेत आहे. आज सर्व विभाग प्रमुखाची बैठक घेतली. ज्या ज्या तक्रारी प्राप्त होत आहेत त्यावर तोड़गा काढ़णार आहोत. कामचुकारपणा करणाऱ्याची गय नाही आणि गैरहजर राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावा, असे आदेश दिल्याची माहिती पालिका आयुक्त वेलरासु यांनी सकाळला दिली.

Web Title: Kalyan Dombivali municipal corporation commissioner P Velrasu