
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबरला दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच दणका दिला.
मुंबई: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबरला दारू पिऊन वाहन चालविणारे आणि त्यांचे सहप्रवासी यांच्यावर कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच दणका दिला. ख्रिसमस 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात वाहन चालक आणि त्यांचे सहप्रवासी यांच्यावर दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई केली.
गुरुवारी कल्याण पश्चिममध्ये वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या पथकाने 23 वाहन चालक आणि 8 सहप्रवासी यांच्यावर कारवाई केली. कल्याण पूर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांच्या पथकाने 15 वाहन चालक आणि 8 सहप्रवासी यांच्यावर कारवाई केली. तर डोंबिवली वाहतूक शाखेने 36 वाहन चालक आणि 14 सहप्रवासी यांच्यावर कारवाई करत तळीरामांना दणका दिला.
दारु पिऊन वाहन चालविण्याबाबत तुमच्याकडे किती ही आयडिया असल्या तरी सुद्धा कारवाई पासून सुटका नाही. मद्य पिऊन वाहन चालविणे दंडनीय गुन्हा असून तुमच्या आणि दुसऱ्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. वाहतूक पोलिसांकडून असं आवाहन करणारा जनजागृती आणि संदेश देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या काळात कल्याण पश्चिमेला वाहतूक पोलिसांनी दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या 18 वाहक आणि त्याच्या सोबत असलेल्या 5 सहकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. कल्याण पूर्व कोळशेवाडी वाहतूक पोलिसांनी 12 वाहन चालक आणि 2 सहकारी तर डोंबिवलीमध्ये 27 वाहन चालक आणि त्यांचे 2 सहकारी यांच्यावर कारवाई केली आहे.
हेही वाचा- वाशीतल्या मनपा रुग्णालायत येणाऱ्या रुग्णांची अँटीजन टेस्ट, नियोजन नसल्याने रुग्ण त्रस्त
-----------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Kalyan Dombivali Traffic police took action 31st night new year eve