कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती निवडणुकीला मुहूर्त मिळेना

रविंद्र खरात 
शुक्रवार, 15 मार्च 2019

कल्याण - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूकीला मुहूर्त मिळत नसल्याने सभापती पदाच्या इच्छूकांचे जीव टांगणीला लागले आहेत .

कल्याण - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूकीला मुहूर्त मिळत नसल्याने सभापती पदाच्या इच्छूकांचे जीव टांगणीला लागले आहेत .

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के सहित नितीन पाटील राजेंद्र दीक्षित , संतोष चव्हाण , प्रल्हाद म्हात्रे , शैलेंद्र भोईर असे 6 सदस्यांचा  28 फेब्रुवारी रोजी कालावधी संपल्याने 6 सदस्य पदाची निवडणूक 15 फेब्रुवारी रोजी पार पडली . या चुरशीच्या निवडणूक मध्ये शिवसेना सुनील खारुक , बंडू पाटील , अनिल पिंगळे , भाजपाचे स्वप्नील काटे , संजय मोरे , दिनेश गोर हे विजयी झाले होते . या निवडणुकीचा अहवाल पालिका सचिव संजय जाधव यांनी कोकण आयुक्त यांना पाठवून सभापती निवडणूक बाबत निवडणूक अधिकारी देण्याची मागणी केली होती त्यानुसार सभापती निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती कोकण विभागीय आयुक्तांनी केल्याचे समजते .यामुळे 15 मार्च रोजी सभापती निवडणूक होईल असा अंदाज वर्तविला जात होता ,मात्र लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्याने सभापती निवडणूक मुहूर्त लागत नसल्याने इच्छूकांचे जीव टांगणीला लागले आहेत .

सभापती पदासाठी चढाओढ ...
परिवहन समिती मध्ये शिवसेना भाजपाची सत्ता असून युतीच्या करारानुसार नवीन सभापती शिवसेनेचा होणार असून शिवसेनेचे मनोज चौधरी , मधुकर यशवंतराव , सुनील खारुक , बंडू पाटील , संजय पावशे , अनिल पिंगळे यांच्या मध्ये कुणाच्या गळ्यात सभापती पद पडते याकडे लक्ष्य लागले आहे .

लोकसभा विधान सभा आचारसंहिताचा फटका ...
सध्या लोकसभा निवडणुक आचारसंहिता लागू झाल्याने नवीन सभापती निवडणूक झाली तरी प्रत्यक्ष कामकाज नवीन सभापतीला 23 मे नंतर करता येणार असून लोकसभा निवडणूक नंतर काही महिन्यात विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू होणार असल्याने नवीन सभापतीला कामकाजाला कमी वेळ मिळणार आहे .मात्र आता ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर सभापती निवडणूक तारीख कधी जाहीर करतात याकडे लक्ष्य लागले आहे .
 

Web Title: Kalyan Dombivli Municipal Corporation's Transportation Committee will get the approval of the election