कल्याण ते कसारा रेल्वेसेवा काही काळ विस्कळीत

रविंद्र खरात
गुरुवार, 19 एप्रिल 2018

कल्याण: शहाड ते आंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान असलेल्या रेल्वे फाटक मध्ये आज (गुरुवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास वाहनाची लांब लचक रांग लागल्याने फाटक परिसरात वाहतूक कोंडी झाली. यामुळे कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान काही काळ वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

रेल्वे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान असलेल्या रेल्वे फाटक मध्ये आज  साडे अकराच्या सुमारास वाहनाची लांब लचक वाहनाची रांग लागली आणि परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने काही काळ कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान सुरू असलेल्या लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले होते. यामुळे रखरखत्या उन्हात लोकल उशिरा धावत असल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्याने अखेर रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही कोंडी दूर केली. मात्र, याचा परिणाम दुपार पर्यंत रेल्वे सेवेवर पडला होता.

रखडलेला उड्डाणपूल...
रेल्वे फाटक मधील वाहनाची ये-जा करत असल्याने वडवली जवळ काही वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने उड्डाणपूल बांधण्यात सुरू केला. मात्र, तो आज ही अर्धवट परिस्थिती मध्ये रखडल्याने आज पुन्हा हा प्रश्न समोर आला असून, हा उड्डाण पूल कधी पूर्ण होणार असा सवाल केला जात आहे.

Web Title: Kalyan to Kasara railway service was disrupted for some time