मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवा: शिवसेना 

shiv-sena
shiv-sena

कल्याण - मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या विविध मागण्या, अडचणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे कर्मचारी वर्ग अस्वथ असून, त्याचा कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे त्वरित त्यांच्या मागण्या आणि अडचणी दूर कराव्या अशी मागणी शिवसेना पालिका गटनेते आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना कार्याध्यक्ष रमेश जाधव यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कारभार चालविताना नगरसेवका सोबत अधिकारी कर्मचारी वर्गाची भूमिका महत्वाची असते. अधिकारी कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणी आहेत. त्याचा विचार व्हायला व्हावा. प्रशासन कोणत्याही अधिकारी वर्गाला प्रभारी चार्ज देत असल्याने पालिका हद्दीत अनेक प्रकल्प रखडलेले आहेत, असा रमेश जाधव यांनी केला आहे. मनपा प्रशासनात काम करताना तज्ञ व कर्तव्य दक्ष अधिकारी कर्मचाऱ्याना त्यांच्या अंगी असलेले गुण दाखविता येत नाही. त्याचे कारण प्रभारी चार्ज देण्याचे धोरण नसल्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचाऱ्याना संधी मिळत नाही. यामध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्याना योग्य संधी मिळत नाही तर पदोन्नतीचे प्रश्न, वेतन श्रेणीचे प्रश्न, कर्मचाऱ्याचे होणारे खच्चीकरण याचा कामावर परिणाम होत आहे. यावर लवकर न्याय द्यावा अशी मागणी जाधव यांनी केली असून, वेळप्रसंगी सभागृहात प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . 

करणाऱ्यांच्या मागण्या 
- एका पदावर 24 वर्षांपेक्षा जास्त कालावधी काम करणाऱ्याना वरिष्ठ वेतनश्रेणी द्यावी
- अधिकारी वर्गाला प्रभारी पदावर नियुक्ती देण्याऐवजी पदोन्नती पदावर नियुक्ती करावी 
- प्रभारी चार्ज देण्याचे धोरण ठरवावे 
- सेवाभर्ती नियमामधील जाचक अटी रद्द करण्यात याव्या 
- सफाई कर्मचारी वर्गाला वर्षातून दोन वेळा सुरक्षित आणि उत्तम दर्जाचे उपकरण तसेच हात मोजे, बूट, कपडे, रेनकोट द्यावे 
- सफाई कर्माचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी
- अनुकंपा तत्वावरील त्वरित भरती करावी 
- ऑन ड्युटी कर्मचारी आणि अधिकारी वर्गास मारहाण होते ही गंभीर बाब असून, या केसेस पालिके कडून लढल्या जाव्यात 
- सेवा निवृत्ती समारंभ खर्च त्या त्या विभागातील पेटीकॅश मधून करण्यात यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com