
कल्याणमधील योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा हाईट्स इमारतीत राहणारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) वरिष्ठ अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी त्यांच्या शेजारी असलेल्या देशमुख कुटुंबावर केलेल्या हल्ल्याने राज्यात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये अखिलेश शुक्ला देशमुख कुटुंबातील दोन भावांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करताना दिसले. यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. तर आता त्यांच्या अटकेची बातमी समोर आली आहे.