'पुढच्या वेळेस दाढी लावून येईन', मनसे आमदार राजू पाटलांचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

"आतापर्यंत आयुक्तांकडून एकही काम झालं नसल्याने पुढच्या वेळेस येताना आपण आता दाढी लावून येणार"
'पुढच्या वेळेस दाढी लावून येईन', मनसे आमदार राजू पाटलांचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

डोंबिवली- नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांकडे जाण्याऐवजी संबंधित विभाग अधिकाऱ्यांची मनसे आमदार राजू पाटील (Mns mla raju patil) यांनी सोमवारी भेट घेतली. आयुक्त आमचे कोणतेही काम करत नाही. कामाची फाईल संबंधित विभागात केवळ फिरवली जाते. म्हणून आम्ही आता संबंधित विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यापुढे येताना दाढी लावून येतो मग काम होते का पाहू असे म्हणत, त्यांनी ठाणे जिल्ह्याचे (thane district) पालकत्व संभाळणाऱ्यांना अप्रत्यक्ष टोमणा मारला.

कल्याण ग्रामीण येथील देशमुख होम्स कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने सोमवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांची भेट घेतली. पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकर दूर होऊन नागरिकांना पाणी मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची यासंबंधी भेट न घेता विभाग अधिकाऱ्यांना भेटले याविषयी आमदारांना विचारले.

'पुढच्या वेळेस दाढी लावून येईन', मनसे आमदार राजू पाटलांचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला
सिग्नल मोडला आणि सापडली चोरी झालेली स्कुटी, मुंबईतील घटना

त्यावर ते म्हणाले की, "आयुक्तांना आजमितीला शंभर पत्रं पाठवली. मात्र आयुक्त हे पत्र संबंधित विभागाला पाठवतात तेथून काही उत्तरच येत नाही. त्यामूळे आयुक्तांकडे न जाता थेट संबंधित विभागात गेलो. आतापर्यंत आयुक्तांकडून एकही काम झालं नसल्याने पुढच्या वेळेस येताना आपण आता दाढी लावून येणार" असे सांगत त्यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोमणा मारला. आयुक्त हे ठाण्याचेच आदेश ऐकतात अशी चर्चा यापूर्वीही कल्याण डोंबिवलीत होती. सोमवारी मनसे आमदारांनी अप्रत्यक्षपणे का होईना त्याचे सूतोवाच केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com