कल्याण पूर्व मधील तिसाई देवी यात्रा सुरु 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

कल्याण - आगरी कोळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या कल्याण पूर्व तिसगाव मधील सुप्रसिध्द जरिमरी तिसाई देवीच्या यात्रेला आज शनिवार ता 31 मार्च पासून सुरुवात झाली. यासाठी शहरातील आणि शहराबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी केडीएमटी विशेष बससेवा सुरू करण्यात आली असून, त्याचे उदघाटन युवा नेते वैभव गायकवाड आणि सभापती सुभाष म्हस्के  यांच्या उपस्थित करण्यात आले .

दरवर्षी प्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी कल्याण पूर्व मधील जरिमरी तिसाई देवीची यात्रा असते. सकाळी 6 वाजता देवीला अभिषेक आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीचा श्रृंगार आणि पुष्प सजावट झाल्यावर देवीच्या दर्शनाला सुरुवात झाली.

तिसगाव मध्ये गर्दी ...
यात्रा असल्याने तिसगाव नाका ते तिसाई देवी मंदीर या दुतर्फा रस्त्यावर खाऊ गल्ली, आकाश पाळणा, खेळणी विक्री करणाऱ्या विक्रत्यांनी दुकान थाटली असून, यात्रेचा आनंद लूटण्यासाठी भविकांची भाऊ गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.

यात्रा स्पेशल केडीएमटी बस सेवा 
आगरी कोळी समाजाचे आराध्य दैवत श्री तिसाई जरी-मरी देवीची यात्रा असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या काळात यात्रेकरूंची सोय व्हावी म्हणून तिसाई देवी यात्रा स्पेशल केडीएमटी बस सुरू करण्यात आली आहे. आज शनिवार ता 31 मार्च रोजी सकाळी 12च्या सुमारास कल्याण पूर्व मधील युवा नेते वैभव गायकवाड यांच्या हस्ते बसते उदघाटन झाले. तर यावेळी परिवहन समिती सभापती(केडीएमटी) सुभाष म्हस्के उद्योजक संजय मोरे, अनिल म्हात्रे, दीपेश गायकवाड, नितेश म्हात्रे, दिनेश  अग्रवाल, गोरख म्हसले, विवेक म्हसे, विजय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

बस मार्ग 
कल्याण पूर्व सिद्धार्थ नगर ते तिसगाव नाका मार्गे आमराई आणि दुसरी बस कल्याण पश्चिम दीपक हॉटेल ते नेतवली पत्रिपुल मार्गे चक्कीनाकामार्गे तिसगाव नाका असणार आहे. या मार्गावर 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत बस सुरू राहणार असून, कल्याण पूर्व मधील सिद्धार्थ नगर ते तिसगाव नाका मार्गे आमराई ही बस पुढे कायम स्वरूपात सोडावी यासाठी आदेश दिले जातील अशी माहिती सभापती सुभाष म्हस्के यांनी दिली. .

Web Title: kalyan mumbai tisai devi yatra