Kalyan Municipal Corporation taken action against Encroachment on Footpath
Kalyan Municipal Corporation taken action against Encroachment on Footpath

कल्याणमध्ये महापालिकेने हटविली पदपथावरील अतिक्रमणे

कल्याण : शहरातील पदपथावर फेरीवाले आणि दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना चालता येत नसल्याच्या तक्रारी पाहता पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या आदेशानुसार कल्याण पश्चिमप्रमाणे आज (शुक्रवार) कल्याणमध्येही पदपथावरील अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी काही व्यापारी वर्गाने विरोध केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत अनेक रस्ते आणि पदपथावर दुकानदार आणि फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना त्रास होता. तक्रारी करूनही पालिका प्रभागक्षेत्र अधिकारी कारवाई करत नसल्याने पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी स्वतः रस्त्यावर उतरत कारवाईला सुरवात केली. आज कल्याण पूर्वमध्ये विठ्ठलवाडी रेल्वे परिसर ते टाटापावर या पूना लिंकरोडच्या पदपथ आणि रस्त्यावर दुकानदार आणि फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणावर प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि वसंत भोंगाडे यांच्या पथकाकडून जेसीबीच्या सहाय्याने धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान नितीन राज हॉटेलजवळील व्यापाऱ्यांनी कारवाईला काही प्रमाणात विरोध केला. कारवाईसंदर्भात कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना दिली नसल्याचा आक्षेप तेथील व्यापाऱ्यांचा होता. तर पदपथावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना देण्याचा प्रश्नच नसल्याचे पालिका प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी सांगितले. यावेळी काही काळ तणाव होता. मात्र, या वादात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कारवाईला पुन्हा सुरवात करण्यात आली .

या कारवाईत व्यापाऱ्यांनी पदपथावर केलेली बांधकामे ; नामफलक तसेच पायऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईने पदपथ मोकळे झाले असलेतरी ही कारवाई सातत्याने केली जावी, अशी मागणीला जोर धरू लागली आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com