कल्याण-मुरबाड रस्ता : 27 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास

नंदकिशोर मलबारी
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

सरळगांव - कल्याण शहराकडे प्रवास करत असताना मुरबाड तालुक्याची हद्द संपताच वाहान चालकांना वाहान चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. हे अंतर पार करण्यासाठी या अगोदर वाहान चालकास फक्त 30 ते 35 मिनिटे लागत होते. मात्र मुरबाड - कल्याण हे 27 किलो मिटरचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. 

सरळगांव - कल्याण शहराकडे प्रवास करत असताना मुरबाड तालुक्याची हद्द संपताच वाहान चालकांना वाहान चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. हे अंतर पार करण्यासाठी या अगोदर वाहान चालकास फक्त 30 ते 35 मिनिटे लागत होते. मात्र मुरबाड - कल्याण हे 27 किलो मिटरचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. 

मुरबाडची हद्द संपताच वाहान चालकांना आपली वाहने खंड्डे पडून चाळण झालेल्या रस्त्यावरून चालवावी लागत असल्याने वाहान चालक, वाहनातून प्रवास करणारे प्रवाशी व आपला जीव धोक्यात घालून प्रवास करणारे मोटरसायकल चालवणारे चालक संत्ताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. कल्याण - मुरबाड हा रस्ता चौपदरी होणार असल्याने संबंधीत खाते या रस्त्याची दुरुस्ती देखील करीत नसल्याने माणसांबरोबर गाड्याची आजारी पडू लागल्या आहेत. रस्त्यावर पडलेले खंड्डे चूकविताना अनेक मोटरसायकलचे किरकोळ अपघात होऊ लागले आहेत. 

मुरबाड तालुक्यातील आजारी रूग्ण व माळशेज घाटात वारंवार होणा-या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी उल्हासनगर, कल्याण, कळवा किंवा मुंबई येथे न्यावे लागत असल्याने रूग्णवाहीकेलाही या रस्त्यावरून जाणे कठीण झाल्याने अनेक रूग्णाचे प्राण धोक्यात आले आहे. माळशेज घाट मार्गे कल्याण, मुंबई येथील मार्केटमध्ये भाजीपाला, दूध, कोंबडी वाहातूक करणारे शेकडो वाहाने या रस्त्यावरून जात असतात. या वाहनांचे चालक आपला माल वेळीच मार्केटमध्ये पोहचवण्यासाठी खंड्डे चुकवत, वाहान चालक आपली वाहाने वेगाने नागमोडी चालवत असल्याने अनेक अपघात होत असल्याने रोज या रस्त्यावरून जाणारे चाकर मानी आपला जीव मुठीत धरून कामावर जाताना दिसून येत आहेत.     

गणपती उत्सव जवळ आल्याने गणपती बाप्पालाही याच रस्त्यावरून जावे लागणार असल्याने गणपती बाप्पा तूच आता या खात्याला सदबूद्दी दे अशी मागणी जनतेकडून होत आहे.

Web Title: Kalyan-Murbad road: One to two hours to cross the distance of 27 km