मला काम कुणाला करून दाखवायचे नाही: आयुक्त पी. वेलरासु

रविंद्र खरात 
रविवार, 24 सप्टेंबर 2017

सुविधा नाही तर कर नाही
आजपर्यंत अनेक पत्र आणि समस्यां मांडल्या आयुक्त वेळ देत नाही. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना घेऊन पालिका आयुक्त पी. वेलरासु काम करत आहेत. नागरिक कर भरून ही सुविधा मिळत नसल्याने 2 ऑक्टोबर पासून जन आंदोलन करू अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दिली.

कल्याण : सोशल मीडियावर काय सुरू आहे मला माहित नाही, मला शासनाने नियुक्त केले आहे, त्यानुसार येथे काम करत आहे, अनेक विकास कामे हाती घेतल्याने कमी वेळेत जास्त नियोजनबद्ध काम करायचे आहे, मला काम कुणाला करून दाखवायचे नाही, नागरिकांना आवाहन आहे तुम्हाला मूलभूत सुविधा निश्चित मिळतील मात्र थोडा वेळ द्यावा असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त पी वेलरासु यांनी सकाळशी बोलताना केले. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त पदाची सूत्र पी वेलरासु यांनी हाती घेतल्यावर पालिकेच्या कामामध्ये फेरबदल केले आहेत. नागरिकांना वेळ न देता नागरिकांनी पालिका उपायुक्त यांना भेटावे. पालिकेच्या तिजोरीत पैसा नाही तर वाढीव काम रोखण्याचे आदेश दिले आहेत. अनेक वेळा आयुक्त आढावा मीटिंगमध्ये तर मंत्रालयामध्ये मीटिंगमध्ये गेल्याने सर्व पक्षिय नगरसेवक त्रस्त, निधी नसल्याने विकास काम खुंटली म्हणून कधी शिवसेना तर कधी भाजपा नगरसेवक नाराज, यामुळे शहरात खड्डे, कचरा, प्रश्न पेटला असून सर्व सामान्य नागरिक ही सोशल मीडियावर बोलू लागला की सुविधा नाही तर कर नाही तर नवी मुंबई मधील तुकाराम मुंढे नागरिकांत जायाचं. मात्र या आयुक्तांना वेळ नाही अशी टीका सोशल मीडियावर गाजत असून 2 ऑक्टोबरपासून जन आंदोलन सुरू होणार असल्याने पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्याशी संपर्क साधला असता म्हणाले की शासनाने नियुक्ती केल्यानुसार मी काम करत आहे, कमी वेळात जास्त काम करायचे आहे, स्मार्ट सिटी प्रकल्प, अनेक विकास काम मार्गी लावायची आहे मात्र पालिकेच्या तिजोरीत पैसा आहे त्यानुसार नियोजन करायचे आहे, पालिकेत आढावा मीटिंग तद्नंतर मंत्रालय मध्ये अनेक मीटिंग, न्यायालयामधील तारखा याचे नियोजन करावे लागते. यामुळे पालिका अधिकारी वर्गाला काम वाटून दिले आहे. मी मंत्रालयामध्ये गेलो याचा अर्थ सर्व पालिका अधिकारी कर्मचारी गेले काय असा सवाल करत कुणाला काय म्हणायचे बोलू द्या. सोशल मीडिया वर काय सुरू आहे हे मला माहित नाही किंवा बघायची इच्छा नाही. मला कुणाला दाखवून द्यावयाचे नाही की मी किती काम केले हा सरकार आणि जनतेला बांधील आहे. थोडा वेळ द्या निश्चित नागरिकांना अपेक्षित काम होतील, असा दावा पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी केला.

सुविधा नाही तर कर नाही
आजपर्यंत अनेक पत्र आणि समस्यां मांडल्या आयुक्त वेळ देत नाही. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना घेऊन पालिका आयुक्त पी. वेलरासु काम करत आहेत. नागरिक कर भरून ही सुविधा मिळत नसल्याने 2 ऑक्टोबर पासून जन आंदोलन करू अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दिली.

कल्याण पूर्व मध्ये अनेक वर्षे नागरिक मूलभूत सुविधा पासून वंचीत असून 2 ऑक्टोबर रोजी पालिके विरोधात मेणबत्ती मोर्चा आयोजित करण्यात आला असून तद्नंतर नागरिक कर भरणार नसल्याचे आंदोलन करणार असल्याची माहिती कल्याण स्वराज्य सामाजिक संघटना अध्यक्ष प्रथमेश सांवत यांनी दिली.

Web Title: Kalyan news commissioner P Welrasu statement