कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सावरकर सभागृहाचे छत कोसळले

सुचिता करमरकर
बुधवार, 12 जुलै 2017

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहमधील छत आज (मंगळवार) अचानक कोसळले. सुदैवाने छत कोसळले त्यावेळी सभागृहात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहमधील छत आज (मंगळवार) अचानक कोसळले. सुदैवाने छत कोसळले त्यावेळी सभागृहात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाची इमारत 2001 साली बांधण्यात आली होती. आज या सभागृहाचे छत अचानक कोसळले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेवरून संबंधित अधिकाऱ्यांचं सभागृहाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्याचे आढळून दिसून येत असून या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रतिक्रिया महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: kalyan news dombiwali news marathi news sakal news