कल्याण, डोंबिवलीत जोरदार पाऊस; पाणी तुंबल्याने नागरिकांची तारांबळ

रविंद्र खरात
रविवार, 25 जून 2017

कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत शनिवारी वीजांच्या कडकडाटासह पावसाने दमदारपणे हजेरी लावली. एका चाळीवर वीज कोसळली तर काही घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान छोटे नाले आणि गटारे साफ न झाल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत शनिवारी वीजांच्या कडकडाटासह पावसाने दमदारपणे हजेरी लावली. एका चाळीवर वीज कोसळली तर काही घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान छोटे नाले आणि गटारे साफ न झाल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

डोंबिवलीमधील सरोवर नगरमधील एका चाळीवर मध्यरात्री वीज कोसळली. सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र वीज कोसळल्याने परिसरातील 3-4 घरातील विद्युत उपकरणांना हानी पोहोचली. तर काही घरांच्या पत्र्यांना तडे गेले. परिसरात तेरा झाडे पडली आहेत. दरम्यान महानगरपालिकेने छोटे नाले आणि गटारे साफ न झाल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने चित्र दिसून आले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

कल्याण पूर्व हाजीमलंग रस्त्यावरील अर्धवट रस्ते, सखल भाग, पाणी निचरा होण्यास जागा नसल्याने, 100 फुट रोड पावसाच्या पाण्याने तुंडुब वाहत होते. पिसवली आणि नांदवलीमधील सात ते आठ इमारतीचा संपर्क तुटला होता. द्वारली, पिसवली, मानेरे पाइप लाइन रोड, फिप्टी फिप्टी धाब्याच्या मागील परिसर आणि काही नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पालिका हद्दीत टिटवालामधील मोहने अटाळी, बल्याणी परिसर मध्ये पानी साचले होते. शिवाय जुने मनीषा नगर, तपोवन सोसायटी, परिसरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले, डोंबिवली मधील रामनगर, फडके रोड, सुखी जीवन सोसायटी, शिवसृष्टी सोसायटी आदी परिसरामध्ये पाणी साचले होते. या पडलेल्या पावसाने पालिकेच्या छोटे नाल्याच्या सफाईचा पोल खोल केला.

पालिकेच्या आपत्कालीन विभागामधून पावसाच्या सूचना मिळताच पालिकेचे पालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी कल्याण पूर्व, हाजी मलंग रोड, डोंबिवली, टिटवाला आणि कल्याण पश्‍चिममध्ये पाहणी करत अधिकारी वर्गाला त्वरित काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डोंबिवली मध्ये काही घरावर विज कोसळली याबाबत तहसीदार यांना कळविले असून त्यांच्या मार्फ़त पंचनामा केला जाईल. "जेथे पाणी साचले आहे, तेथे पाहणी केली. जेव्हा जेव्हा भर्ती असेल तेव्हा प्रत्येक प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये जेसीबी आणि कर्मचारी वर्ग सज्ज ठेवा. सखल भागात नागरिकाना सूचना देण्याचे आदेश दिले आहेत', अशी माहिती पालिका अतिरक्त आयुक्त संजय घरत यांनी दिली.

Web Title: kalyan news dombiwali news rain monsoon water issue