कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यावर साचले पाणी

रविंद्र खरात
मंगळवार, 27 जून 2017

सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या संततधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. तर बऱ्याच रस्त्यांवर पाणी साचले. ग्रामीण भागात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. पालिकेच्या मल्लनिस्सारन विभागाने अर्धवट बांधलेल्या नाले-गटांरामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कल्याण - सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या संततधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. तर बऱ्याच रस्त्यांवर पाणी साचले. ग्रामीण भागात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. पालिकेच्या मल्लनिस्सारन विभागाने अर्धवट बांधलेल्या नाले-गटांरामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

आज (मंगळवार) सकाळपासून कल्याण-डोंबिवलीतील शहरी आणि ग्रामीण भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे कल्याण पश्‍चिममधील शिवाजी चौकातील अर्धवट बांधून झालेले नाले आणि फुटपाथखालील छोट्या गटारांची सफाई न केल्याने त्याचा ठिकठिकाणी पाणी साचले. महंमद अली चौकाकडे जाणारा रस्ता खचल्याने शिवाजी चौकात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. गुजराती शाळा, पाटील चाळ, चिकनघर, आदी परिसरामध्ये पावसाचे पाणी साचले होते. कल्याण पूर्वमधील खडेगोलवली नाल्याने धोक्‍याची पातळी ओलांडली. त्यामुळे परिसरातील बैठ्या चाळीत पाणी घुसले होते. कल्याण हाजी मलंग रस्त्यात आणि आजूबाजूच्या बैठ्या चाळीत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. आडिवली ढोकली आणि मानेरे परिसरामध्ये नागरिकांच्या घरात पाणी साचले. डोंबिवली गुप्ते रोड, मधुबन सोसायटीसमोर ड्रेनेज लाईन तुडंब वाहत होती. पालिकेच्या मलनिस्सारन विभागामार्फत सांडपाणी वाहून नेणारे भुयारी गटार अर्धवट बांधले. तर काही ठिकाणी साफ न केल्याने घाणीचे साम्रज्य पसरली होते. यामुळे पालिकेच्या अर्धवट कामाचा फटका नागरिकांना बसला.

Web Title: kalyan news dombiwali news water on road