कल्याण रेल्वेस्टेशन परिसरातील फेरीवाला प्रश्न सुटता सुटेना

रविंद्र खरात
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर बेकायदेशीर रिक्षा उभ्या तर फुटपाथ वर फेरीवाल्याचे अतिक्रमण असल्याने नागरिकांना स्टेशन आणि स्टेशन वरून घरी जाणे जिकरीचे झाले आहे .यापूर्वीचे पालिका आयुक्त ई रवींद्रन यांनी भीष्म प्रतिज्ञा केली होती की कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करू तशी प्रक्रिया ही सुरू झाली मात्र त्यांची बदली झाली मात्र कल्याण आणि डोंबिवली स्टेशन परिसर मधील फेरीवाले हटले नाही. 

कल्याण : कल्याण शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटता सुटेना असेच काहीसे म्हणण्याची वेळ आता कल्याणकरांवर आली असून कल्याण रेल्वे स्थानक परिसर आणि स्कायवॉक परिसर सदैव फेरीवाल्यांच्या विळख्यात असल्याने या ठिकाणाहून नागरिकांना प्रवास करणे गैरसोयीचे झाले असून हा फेरीवाला मुक्त होणार असा सवाल कल्याणकर करू लागले आहेत.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर बेकायदेशीर रिक्षा उभ्या तर फुटपाथ वर फेरीवाल्याचे अतिक्रमण असल्याने नागरिकांना स्टेशन आणि स्टेशन वरून घरी जाणे जिकरीचे झाले आहे .यापूर्वीचे पालिका आयुक्त ई रवींद्रन यांनी भीष्म प्रतिज्ञा केली होती की कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करू तशी प्रक्रिया ही सुरू झाली मात्र त्यांची बदली झाली मात्र कल्याण आणि डोंबिवली स्टेशन परिसर मधील फेरीवाले हटले नाही. 

पालिका आयुक्त ई रवींद्रन यांची बदली होताच पालिका आयुक्त पदाची सूत्र पी. वेलरासु यांनी घेताच त्यांनी ही मागील आयुक्त प्रमाणे आढावा बेठकीला जोर दिला, वाहतूक पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि पालिका यांच्या संयुक्तपणे कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरटीओ आणि वाहतूक विभागाने कारवाई सुरू केली होती. बेशिस्त रिक्षा चालकांवर चाप बसली मात्र फेरीवाल्यावर कारवाई झाली नसल्याने पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी सेल्फीचा उपयोग करत कामचुकार अधिकारी वर्गाला चिमटा काढताच कल्याण स्टेशन परिसरामध्ये फेरीवाल्या विरोधात धडक कारवाई झाली. यामुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर पालिका आयुक्त पी. वेलरासु यांची शाबासकीची थाप पडताच पुन्हा कारवाई थंडावल्याने कल्याण स्टेशन बकाल झाले असून फेरीवाले पालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला का जुमानत नाही यावरून उलट सुलट चर्चा सुरू आहे.

वाहतूक पोलिसांची कारवाई मात्र पालिका ढिम्म ....
वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव आणि त्यांची टीम प्रतिदिन स्टेशन परिसरात सकाळी 9 ते 12 या कालावधीत वाहतूक कोंडी दूर करणे, बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करत असतात त्यावेळी स्टेशन परिसर मधील फेरीवाले आणि रिक्षावाले  गायब असतात मात्र त्यांचे पथक तेथून निघून जातात पुन्हा स्टेशन परिसर बकाल होते. फेरीवाला विरोधी पथक कारवाई मध्ये सातत्य का ठेवत नाही याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येते.

वाहतूक कोंडी दूर करणे, बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई नेहमीत सुरू असताना या परिसर मध्ये फेरीवाले बसत नाही मात्र माझी पाठ फिरताच तेथे फेरीवाले बसतात , सकाळी आणि संध्याकाळी स्टेशन मध्ये गर्दी असते यावेळी तरी यांची दादागिरी नसावी अशी सर्व सामन्य नागरिकांची मागणी आहे, आम्ही कारवाई करतो मात्र पालिका का कारवाई करत नाही त्यांचे अधिकारी सांगू शकतात अशी प्रतिक्रिया कल्याण वाहतूक शाखा वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली. 

फेरीवाल्या विरोधात दोन सत्रात कारवाई होते , त्यांच्या सामानाची ही तोडफोड करतो आम्ही मात्र पुन्हा ते फेरीवाले बसतात त्याला मी काय करू असा सवाल क प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी यांनी दिली.

Web Title: Kalyan news encrochment in kalyan