पर्यावरण समतोल राखण्यासाठी  तरुणांनी पुढे यावे - नरेंद्र पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

कल्याण - पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडे लावणे महत्त्वाचे नाही, तर ती जगवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत भाजपचे प्रदेश सरचिटणीस व आमदार नरेंद्र पवार यांनी येथे व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ उपक्रमांतर्गत सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन पवार यांनी या वेळी केले.  जागतिक पर्यावरण दिनानिमित कल्याण-डोंबिवली महापालिका, महिला व बालकल्याण विभाग, बिर्ला महाविद्यालय व इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहर परिसरात वृक्षारोपण व सायकल फेरी काढण्यात आली.

कल्याण - पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडे लावणे महत्त्वाचे नाही, तर ती जगवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत भाजपचे प्रदेश सरचिटणीस व आमदार नरेंद्र पवार यांनी येथे व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ उपक्रमांतर्गत सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन पवार यांनी या वेळी केले.  जागतिक पर्यावरण दिनानिमित कल्याण-डोंबिवली महापालिका, महिला व बालकल्याण विभाग, बिर्ला महाविद्यालय व इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहर परिसरात वृक्षारोपण व सायकल फेरी काढण्यात आली. त्याचे उद्‌घाटन महापौर राजेंद्र देवळेकर आणि आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार पवार बोलत होते. कार्यक्रमास माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र, शिक्षण समितीच्या सभापती वैजयंती घोलप, भाजप नगरसेवक अर्जुन भोईर, सहायक पोलिस आयुक्त डी. बी. कांबळे आदींसह पालिका अधिकारी आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्षतोडीमुळे आजवर पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मानवी अस्तिवाला धोका निर्माण झाला आहे. मानवी जीवन सुरक्षित व समतोल राखण्यासाठी सर्वांनी आपापल्या परिसरात एक झाड लावून, ते जगवणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे पवार यांनी सांगितले. योगा दिनाप्रमाणे पर्यावरण दिनही महत्त्वाचा आहे, हे पवार यांनी उदाहरणांसह पटवून दिले. महापौर देवळेकर, डॉ. नरेशचंद्र यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

Web Title: kalyan news environment narendra pawar