'ई सकाळ'च्या वृत्तानंतर खड्डे बुजविण्यास सुरुवात...

रविंद्र खरात
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कल्याणः पावसाळा आणि परतीच्या पावसाने शहरातील रस्ते आणि पुलावर खड्डे झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरीक त्रस्त होते, ही बातमी बुधवारी (ता. 11) 'ई सकाळ'वर प्रकाशित झाली होती. या वृत्ताची दखल घेत पालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामाला आज (शुक्रवार) पासून सुरुवात केली.

कल्याणः पावसाळा आणि परतीच्या पावसाने शहरातील रस्ते आणि पुलावर खड्डे झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरीक त्रस्त होते, ही बातमी बुधवारी (ता. 11) 'ई सकाळ'वर प्रकाशित झाली होती. या वृत्ताची दखल घेत पालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामाला आज (शुक्रवार) पासून सुरुवात केली.

कल्याण अंबरनाथ बदलापूर जाणारा वालधुनी पूल, कल्याण पूर्व मधील पूना लिंक रोड, कल्याण नगर महामार्गावरील शहाड पूल, कल्याण पूर्व मधील धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपूल आदी परिसरात भले मोठे खड्डे पडल्याने त्या परिसरात वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे सकाळी कामावर जाणारे आणि सायंकाळी घरी जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची बातमी 'ई सकाळ' वर प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत पालिकेने आज सकाळ पासून शहरातील रस्त्यामधील खड्डे बुजविण्यास कामाला सुरुवात केली.

शहरातील रस्‍त्‍यांवर पडलेल्‍या खड्डयांमुळे अपघात होवू नये याकरीता शास्‍ञोक्‍त पध्‍दतीने पॅचवर्क करण्‍याचे आदेश बांधकाम विभागास पालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार पालिका शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांच्या देखरेखी खाली खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली. कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपूलावरील खड्डे बुजविण्यास सुरू झाली असून, आज रात्री पासून शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येणार आहे.

सेल्फी आणि खड्डे साफ....
खड्डे बुजविताना तो पहिला साफ करून गोल करण्या ऐवजी चौकनी आकार खड्डा करून त्यात डांबर टाकण्यात येत होते. यावेळी अधिकारी वर्गाने सेल्फी फोटो काढत कामाचे अपडेट वरिष्ठांना पाठवीत होते.

आज पुन्हा वाहतूक कोंडी...
धर्मवीर आनंद दिघे उड्डान पूलावर खड्डे बुजविण्यासाठी सुरुवात केली, यावेळी एक मालवाहू टेम्पो बंद पडल्याने वाहन चालकांना त्रास झाला. यामुळे त्या परिसरात आणि वालधुनी पुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

पावसाला साकडे ...
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी 15 ऑक्टोबर पासून कार्यक्रम आखला होता. मात्र, दोन दिवस अगोदर कामाला सुरूवात केली असून, ते तांत्रिक दृष्ट्या बरोबर होते की नाही यासाठी पाहणी ही करत अशी माहिती पालिका शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दिली

खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले मात्र दुपारी साडेचार पावणे पाचच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काम थांबविण्यात आले. जो पर्यंत पाऊस थांबत नाही तो पर्यंत काम सुरू करण्यास अडचण आहे, अशी प्रतिक्रिया पालिका शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दिली.

Web Title: kalyan news esakal news and kalyan municipal start road work