कल्याणः 'इंदू सरकार' चित्रपटाचा शो काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाडला बंद

रविंद्र खरात
शुक्रवार, 28 जुलै 2017

कल्याण: मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंदू सरकार' चित्रपटाचा शो आज (शुक्रवार) सकाळी कल्याण पूर्व मधील मेट्रो मॉल मध्ये असलेल्या आयनॉक्स चित्रपटगृहात होणार होता. परंतु, काँग्रेस कार्यकर्त्यांनी तो बंद पाडला.

कल्याण: मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंदू सरकार' चित्रपटाचा शो आज (शुक्रवार) सकाळी कल्याण पूर्व मधील मेट्रो मॉल मध्ये असलेल्या आयनॉक्स चित्रपटगृहात होणार होता. परंतु, काँग्रेस कार्यकर्त्यांनी तो बंद पाडला.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम इंदु सरकार हा चित्रपट करीत असल्याचे सांगत कल्याण जिल्हा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली आयनॉक्स चित्रपट गृहात पहिला शो मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंदू सरकार' चित्रपट सुरु होताच काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते आत घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 'मोदी सरकार हाय हाय, मधुर भांडारकर हाय हाय.. जब ताक सूरज चांद रहेजा इंदिरा तेरा नाम रहेगा' अशा घोषणा देत हा शो बंद पाडला. शिवाय, मधुर भांडारकरच्या फोटोला चपला मारून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त केला.

भाजपच्या सांगण्यावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करण्याचे काम करण्यात आले असून, हा मधुर नव्हे तर मोदी भांडारकर आहे. मधुरला भाजप सरकारने दिलेल्या 'पद्मश्री' पुरस्काराची परतफेड म्हणून त्याने हा चित्रपट बनवल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला.

आंदोलनमध्ये शैलेश तिवारी, शकील खान, कांचन कुलकर्णी, रत्नप्रभा म्हात्रे, अमित म्हात्रे, वर्षा गुजर आदींनी सहभाग घेतला होता. घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत आंदोलनकर्त्याना ताब्यात घेतले.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :

जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत 
कर्जमाफी की कर्जवसुली?
पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ 
स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी 
टोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट 
पुनर्गठित कर्जदारांनाही माफी - मुख्यमंत्री
लालूप्रसाद, राहुल यांना योग्य वेळी उत्तर देऊ: नितीशकुमार
राज्यातील 82 पेट्रोल पंपांत मापात पाप 
परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरविण्याचा काँग्रेसचा अजेंडा: सुषमा स्वराज
मुजोर बॅंक अधिकाऱ्यांना धडा शिकवा - सुनील तटकरे 
काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात
महिला तस्करी रोखावीच लागेल - मुख्यमंत्री

Web Title: kalyan news indu sarkar movie Pulled off congress workers