कल्याण पूर्वमधील नागरी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू: रासू

kdmc
kdmc

कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील मधील नागरी समस्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयन्त करु, अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त पी. वेल. रासू यांनी 'सकाळ''ला दिली.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त ई रवींद्रन यांची बदली नंतर राज्य शासनाने पी. वेल. रासू यांची नियुक्ती केली. त्यांनी पदभार घेतला मात्र ते ही काही दिवसात ट्रेनिंगसाठी गेल्याने अनेक काम रखड़ली होती. ते पुन्हा कामावर रुजू झाल्याने कल्याण पूर्व विधान सभा मतदार संघातील आमदार गणपत गायकवाड़ यांनी आज (मंगळवार) सकाळी पालिका आयुक्त पी. वेल. रासू यांची भेट घेत नागरी समस्या वर लक्ष्य वेधले.

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात पालिकेचे तीन प्रभाग क्षेत्र असून, तेथे सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. घंटा गाडी कमी असल्याने कल्याण पूर्व मध्ये कचरा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण पूर्व मधील अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे आहेत. मात्र, धर्मवीर आनंद दिघे उड़ानपुल आणि वालधुनी पूलावर ही खड्डे पडल्याने वाहन चालक सहित नागरिक त्रस्त असून ते दुरुस्त करावे, कल्याण पूर्व रेल्वे स्थानक ते सिद्धार्थ नगर जो स्कायवाक़ आहे तेथे सी सी टीव्ही कॅमेरा बसवावे, तो पर्यंत पोलिसांनी सायंकाळी स्कायवाक़ परिसर मध्ये गस्त घालावा आणि कल्याण पूर्व मधील अर्धवट रखडलेला गणपती चौकाकड़े जाणाऱ्या स्कायवाक़ काम धिम्या गतीने सुरु आहे त्याला गती दिल्यास नागरिकांना अंधारात प्रवास करावा लागणार नाही.

कचरा न उचल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने उपाय योजना करावी आदी समस्या आमदार गायकवाड़ यांनी पालिका आयुक्त पी. वेल. रासू यांच्या समोर मांडल्या. या मागण्या लवकरात लवकर सोडवू, असे आश्वासन पालिका आयुक्त पी. वेल. रासू यांनी आमदार गायकवाड यांना दिले आहे.

प्रतिक्रिया
अनेक दिवस पालिका आयुक्त रजेवर होते ते पुन्हा कामावर रुजू झाल्याने त्यांची आज भेट घेवून माझ्या मतदार संघातील नागरी समस्या मांडल्या, त्या लवकर सोडवतील, असे आश्वासन आयुक्तानी दिले असल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड़ यांनी दिली.

नुक़ताच मी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. पालिका हद्दी मधील नागरी समस्या बाबत प्रति दिन अधिकारी वर्गाची बैठक घेवून माहिती घेत असून,  आज आमदार गणपत गायकवाड़ ही कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील नागरी समस्या बाबत भेटले. कल्याण पूर्व मधील नागरी समस्या सोडविण्यासाठी अधिकारी वर्गाची बैठक घेवून लवकरात समस्या सोडविण्याचा प्रयन्त करू, अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त पी. वेल. रासू यांनी 'सकाळ'ला दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com