कल्याण रेल्वे स्थानक परिसरमध्ये स्वच्छता मोहीम

रविंद्र खरात
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

कल्याणः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर रेल्वे प्रशासन नुसार प्रत्येक रेल्वे स्थानक परिसरात 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे अभियान राबविण्यात येणार आहे. आज (बुधवार) सकाळी कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण रेल्वे स्थानक परिसरमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या कार्यक्रम अंतर्गत मध्य रेल्वे व कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या वतीने आज सकाळी कल्याण रेल्वे स्थानक परिसर मध्ये स्वच्छता मोहिम राबवली. कल्याण पूर्वला जोडणारा कल्याण रेल्वे स्थानक ते सिद्धार्थनगर स्कायवाक, कल्याण पश्चिम मधील स्कायवाक आणि रेल्वे स्थानक मधील प्लॅटफार्म वरील कचरा साफ करण्यात आला. यावेळी पालिका अधिकारी, रेल्वे अधिकारी वर्गाला आमदार गणपत गायकवाड यांनी स्वच्छते बाबत सूचना दिल्या. या अभियानमध्ये आमदार गणपत गायकवाड, भाजपा ठाणे पालघर विभाग सचिव नाना सूर्यवंशी, संजय मोरे, परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के आणि कल्याण पूर्व मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. स्कायवाकवरील स्वच्छता अभियान मुळे फेरिवाल्याची तारांबळ उडाली. काही भाजीवाल्यांनी आपल्या वस्तू सोडून पळ काढला. काही ठिकाणी फेरीवाले गायब होते, यामुळे कल्याण पश्चिम स्कायवाक वरील फेरीवाला प्रश्न काही सूटत नसल्याचे समोर आले आहे.

आज कल्याण रेल्वे स्थानक आणि स्कायवाक परिसर स्वच्छता अभियान अंतर्गत साफसफाई करण्यात आली. स्कायवाक वरील सुरक्षा प्रश्न आणि स्वच्छता प्रश्न समोर आले, यासाठी लवकरच रेल्वे अधिकारी आणि पालिका अधिकारी वर्गाची बैठक घेवून तोडगा काढला जाईल, अशी माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी 'सकाळ'ला दिली.

Web Title: kalyan news kalyan railway station clean