एका शिवसैनिकाला नोकरीसाठी 15 वर्ष करावा लागतोय संघर्ष...

रविंद्र खरात
शुक्रवार, 7 जुलै 2017

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या बदली वाहक अनिल धानके हा गैरहजर राहिल्याचे कारण सांगत त्याला कामावरुन काढण्यात आले होते. याबाबत धानके याने कामगार न्यायालय मध्ये दाद मागितला असता 28 ऑक्टोबर 2005 कामगार न्यायालयाने धानके याला कामावर घेऊन भरपाई दया, असे आदेश केडीएमटी प्रशासनाला देवूनही त्याला पुन्हा नोकरीसाठी तब्बल 15 वर्ष संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे धानके हे शिवसैनिक असून, पालिकेत आणि परिवहन समितीमध्ये शिवसेनेची सत्ता असताना त्याच्यावर अन्याय होतोय याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या बदली वाहक अनिल धानके हा गैरहजर राहिल्याचे कारण सांगत त्याला कामावरुन काढण्यात आले होते. याबाबत धानके याने कामगार न्यायालय मध्ये दाद मागितला असता 28 ऑक्टोबर 2005 कामगार न्यायालयाने धानके याला कामावर घेऊन भरपाई दया, असे आदेश केडीएमटी प्रशासनाला देवूनही त्याला पुन्हा नोकरीसाठी तब्बल 15 वर्ष संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे धानके हे शिवसैनिक असून, पालिकेत आणि परिवहन समितीमध्ये शिवसेनेची सत्ता असताना त्याच्यावर अन्याय होतोय याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रम सन 1999 मध्ये सुरु झाला. यावेळी बदली वाहक म्हणून कल्याण मधील शिवसैनिक अनिल धानके याला कामावर घेण्यात आले. काम करून ही गैरहजर असल्याचे कारण सांगत धानके याला केडीएमटी प्रशासन ने 17 मे 2002 रोजी कामावरुन काढण्यात आले. अनिल धानके याने कल्याण मधील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकड़े दाद मागितली त्यांनी शासनाकड़े प्रकरण वर्ग केले. शासनाने ठाणे मधील कामगार न्यायलय कड़े हे प्रकरण दिले. यात केडीएमटी प्रशासन आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याने 28 ऑक्टोबर 2005 रोजी अनिल धानके याला कामावर घेवून भरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र, केडीएमटी प्रशासनने धानके याला कामावर न घेता कामगार न्यायलयकड़े पुन्हा अपील केले. पुन्हा कामगार न्यायलयने केडीएमटी प्रशासनला चपराक देत त्यांचा दावा फेटाळत धानके यांना कामावर घेवून भरपाई देण्याचा आदेश कायम ठेवला. हा आदेश 14 मार्च 2016 रोजी देवून ही केडीएमटी प्रशासन काही धानके यांना कामावर न घेता त्यांनी मुंबई उच्च न्यायालय मध्ये धाव घेतली आहे. तेथेही आम्ही समजोता करतो असे दोन्ही बाजूने सांगण्यात आले. मात्र, आज पर्यंत धानके यांना न्याय काही मिळेना. चक्क 15 वर्ष धानके याला नोकरी साठी संघर्ष करावा लागत आहे.

एका शिवसैनिकाला शिवसेनेची सत्ता असताना संघर्ष करावा लागत असल्याचा संताप शिवसैनिक करत आहेत. तब्बल 15 वर्ष धानके प्रकरणामध्ये केडीएमटीने लाखों रुपये खर्च केले. मात्र. तेच पैसे धानके याला दिले असते तर हा वाद चिघळला नसता मात्र केडीएमटी मधील काही अधिकारी आणि परिवहन समिती मधील काही पदाधिकाऱयांच्या आड़मुठ्या धोरणामुळे एकीकडे लाखो रुपये वाया जात असून, दूसरी कड़े धानके नोकरी पासून वंचित राहत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

प्रतिक्रिया
धानके प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालय मध्ये आहे. तड़जोड बाबत सर्वानी प्रयन्त केले. मात्र, सफल न झाल्याने पुढील केस न्यायलय मध्ये सुरु ठेवण्यात येणार असून, निकाल लागल्यास प्रशासन त्याची अंमलबजावणी करेल, अशी माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली.

नोकरी साठी तब्बल 15 वर्ष संघर्ष करत आहे. न्यायलयाने आदेश देवून ही केडीएमटी मधील काही अधिकारी वर्गाच्या राजकारणामुळे माझा बळी जात असून, शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणार असल्याची माहिती अनिल धानके यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

आता शाळा सुटेल, पण पाटी फुटणार नाही; 'खापराची' पाटी होतेय गायब

द. चिनी समुद्रात अमेरिकेची लढाऊ विमाने;चीनला थेट आव्हान

विक्रीतील मध्यस्थ हटवून वाढवला शेतीतील नफा

वयाच्या पंचाहत्तरीतही मुख्याध्यापक झाले विद्यार्थी

मेरे बस में होता, तो बुऱ्हान वणीको जिंदा रखता: काँग्रेस नेता

Web Title: kalyan news kdmc administration anil dhanke and court