"केडीएमसी'च्या आयुक्तपदी गोविंद बोडकेंची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

कल्याण - कल्याण- डोंबिवली महापालिका आयुक्त म्हणून गोविंद बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते आयुक्त पी. वेलरासू यांची रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती झाली आहे. सोमवारी (ता. 19) आपण पदभार स्वीकारणार असल्याचे नवनियुक्त आयुक्त बोडके यांनी सांगितले.

महापालिकेसमोर असलेली आर्थिक चणचण लक्षात घेऊन नवीन आयुक्तांना कारभार करावा लागणार आहे. पी. वेलरासू यांनी आयुक्त म्हणून 2017 मध्ये कार्यभार स्वीकारला होता. मागील 10 महिन्यांत त्यांनी पालिकेचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी कठोर निर्णय घेतले. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने प्रसंगी लोकप्रतिनिधींची नाराजी स्वीकारून त्यांनी अनेक कामे थांबवली. नव्याने येणाऱ्या आयुक्तांना आर्थिक स्थिती सुधारण्याचे महत्त्वाचे काम करावे लागणार आहे.

Web Title: kalyan news kdmc commissioner govind bodake