बेकायदेशीर कपात परत करा; अन्यथा...

रविंद्र खरात
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

कायद्याच्या चौकटीत राहून मान्यताप्राप्त संघटनाना कर्मचाऱ्यांची वर्गणी देण्यासाठी त्यांच्या पगारातून प्रति 100 रुपये कपात केली. मात्र, विरोध झाल्याने ती रक्कम मान्यता प्राप्त संघटनेला दिली नाही. मात्र, याबाबत विधी विभागाकडून अभिप्राय मागितला असून, अभिप्राय आल्यावर पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली.

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कामगारांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतून केडीएमटी प्रशासनाने बेकायदेशीर प्रत्येकी 100 रुपये कपात केली असून, ती परत कामगारांना द्यावी आंदोलन करू, असा इशारा भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी केडीएमटी प्रशासनाला दिला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम अत्यावश्यक अंगीकृत सेवा आहे. उपक्रमातील कामगारांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपोटी महानगर पालिकेने या वर्षाकरीता 3 कोटी अनुदान मंजूर केले आहे. परंतु, परिवहन उपक्रम प्रशासनाने प्रति कामगाराच्या थकबाकीच्या रक्कमेतुन मान्यताप्राप्त संघटनेकरीता शंभर रुपये कपात केली आहे. दरम्यान, कामगारांना 5वा 6वा वेतन आयोग लागू करणे हे केंद्र शासनाच्या धोरणात्मक निर्णय असून, सन 2011 मध्ये परिवहन कामगारांना 6 वा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. केडीएमटीला मिळणारे अनुदानसाठी मान्यताप्राप्त संघटनेचे कुठलेही योगदान नसल्याचा आरोप भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी केला आहे. परिवहन समितीच्या सभेत कुठलाही याबाबत प्रस्ताव माहितीसाठी किंवा मंजुरीसाठी न आणता केडीएमटी प्रशासनाने कामगारांच्या पगारामधून पैसे कपात केलीच कशी? असा सवाल परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी केला आहे.

कामगार अथवा परिवहन समिती सदस्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता केडीएमटी प्रशासनाने 13 ऑक्टोबर रोजी प्रत्येक केडीएमटी कर्मचाऱ्याच्या पगारातून जे प्रति 100 रुपये कपात केला आहे, तो बेकायदेशीर असून तो त्वरित प्रत्येक कामगारांच्या बँकेत जमा करावा अन्यथा उग्र आंदोलन करू? असा इशारा भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी केडीएमटी प्रशासनाला दिला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: kalyan news kdmt administration worker payment issue