केडीएमटी कर्मचारी वर्गाच्या समस्या दूर करा: प्रकाश पेणकर

KDMT
KDMT

कल्याण : केडीएमटी कर्मचारी वर्ग अपुऱ्या सुविधांमध्ये काम करत असून वेळ प्रसंगी तेे आपल्या जीव धोक्यात घालून प्रवासी वर्गाचा जीव वाचविले आहे. त्या कर्मचाऱ्याची पाठ थोपटली पाहिजे. त्यासोबत प्रशासन आणि समिती सदस्यांनीही कर्मचारी वर्गाच्या समस्या दूर केल्या पाहिजे, असे आवाहन परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी एका कार्यक्रमात केले . 

शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कल्याण मोहना कॉलनी केडीएमटी बसचा ब्रेक फेल झाला होता. बसचा ब्रेक फेल झाला म्हणून न घाबरता हनुमंत कदम याने एक ते दीड किलोमीटर पुढे नेत दगडात बस घातली. यामुळे 70 प्रवासी वर्गाचे जीव वाचले, त्याला बस वाहक तानाजी ढेरे याने मदत केली. याबद्दल परिवहन कामगार कर्मचारी संघटनाच्या वतीने आज (सोमवार) कल्याण पश्चिम गणेश घाट डेपोमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती संजय पावशे, परिवहन समिती सदस्य मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव, शरद जाधव, प्रमोद बागुल, संतोष नवले यांच्या समवेत यावेळी केडीएमटीमधील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संघटना अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी केडीएमटीच्या समस्यांकडे लक्ष्य वेधले. डेपोमध्ये जुन्या इमारती, शौचालयमधील दुरावस्था, खराब बस कर्मचारी वर्गाच्या हातात दिल्या जातात, पगार वेळेवर होत नाही या समस्या दूर करण्याचे आवाहन करत पुढे म्हणाले की प्रवाश्यांचे जीव वाचविला म्हणून त्या कर्मचारी वर्गाचे कौतुक करत उपन्न वाढीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

यावेळी सभापती संजय पावशे यांनी कर्मचारी वर्गाचे कौतुक करत एकत्र या उपन्न वाढवा आगामी तीन महिन्यात केडीएमटीचे तीन डिपो सुसज्ज करण्याचे आश्वासन दिले. तर त्याने ड्रेस घातला त्याने घातला नाही अशी तक्रार व्हॉट्सअॅपवर तक्रार करण्याऐवजी प्रशासन, समिती आणि कर्मचारी वर्गाने एकत्र येवून प्रवाश्याना चांगली सुविधा देवू असे सांगत चांगले काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी वर्गाचा वेगळा सत्कार करू आणि त्यासाठी सन्मान चिन्ह ही बनवू असे यावेळी स्पष्ट केले.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com