केडीएमटी डबघाईला; टेकाळे यांना शासन दरबारी परत पाठवा

केडीएमटी डबघाईला; टेकाळे यांना शासन दरबारी परत पाठवा
केडीएमटी डबघाईला; टेकाळे यांना शासन दरबारी परत पाठवा

कल्याणः कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रम दिवसेंदिवस डबघाईला जात असून, ती बाहेर काढण्यासाठी समिती सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार आदींनी सूचना, पत्र देऊन ही दुर्लक्ष करणारे केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे जबाबदार आहेत. त्यांना शासन दरबारी पुन्हा पाठविण्याचा प्रस्ताव बहुमताने आज (शुक्रवार) झालेल्या परिवहन समिती सभेत वादळी चर्चेनंतर ठराव मंजूर करण्यात आला.

कल्याण डोंबिवली महानगर परिवहन समितीची सभा आज पालिका मुख्यालयात झाली. यावेळी केडीएमटी डबघाईला आली असून, त्याला महाव्यवस्थापक देविदास टेकाळे हे जबाबदार असल्याचा प्रस्ताव परिवहन सदस्य संतोष चव्हाण सहित 10 जणांनी मांडला होता. तो विषय येताच वादळी चर्चा झाली. सदस्य संतोष चव्हाण, नितीन पाटील, संजय राणे, राजेंद्र दीक्षित, मधुकर यशवंतराव, प्रसाद माळी, प्रल्हाद म्हात्रे, मनोज चौधरी, सुभाष म्हस्के, कल्पेश जोशी आदींनी चर्चेत सहभाग घेत प्रशासन कसे अपयशी ठरले याची पोलखोळ केली.

देविदास टेकाळे यांनी पदभार घेतल्यानंतर उपन्न घटले. कामचुकार अधिकारी कर्मचारी वर्गावर अंकुश ठेवता आला नाही. दिवाळी मध्ये एसटीचा संप होता त्यात केडीएमटी बसेस सोडण्यात अपयशी ठरले. परिवहन समिती सदस्य यांच्या सुचनांना केराची टोपली दाखवली जाते तर आर्थिक स्थिती हाताळण्यास टेकाळे अपयशी ठरल्याचे आरोप सदस्यांनी यावेळी केले.

टेकाळे यांचा सभात्याग आणि सडेतोड उत्तर...
परिवहन समिती सदस्यांनी आरोप केल्यानंतर महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी सडेतोड उत्तर दिले. यावेळी सभागृह शांत होते. उत्पन्न वाढ झाल्याचा दावा करत, अनेक अडचणी आणि शासनाचे बदलले निर्णय यामुळे काम करावे लागते. कमी कर्मचारी वर्ग असताना काम करत असल्याचे यावेळी टेकाळे यांनी सांगितले. जर अपयश आले त्याला सांघिक जबाबदारी असली पाहिजे माझ्या एकट्याची नाही. मी येण्यापूर्वी डेपो नव्हते, शिस्त नव्हती. मात्र, वेळोवेळी पालिका पदाधिकारी, महापौर, सदस्य, खासदार, आमदार यांच्या सूचना आणि पत्र यांचे खुलासा आणि अंमलबजावणी केल्याचा दावा केला.

नवी मुंबई आणि ठाणे मनपा परिवहन सेवेच्या बसेस या शहरात आल्याने स्पर्धा वाढली असून, त्यात उपन्न आपले घटल्याचे सांगत आता नियोजन बद्ध काम करत असताना माझ्यावर अविश्वास दाखविला जात असेल तर मी सभात्याग करतो, असे सांगत केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी सभात्याग केला. यावेळी त्यांच्या पाठोपाठ अधिकारी कर्मचारी मागे निघताच सदस्यांनी गोंधळ घातल्याने पुन्हा अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जागेवर बसले.

दरम्यान, सभागृहातील गोंधळ आणि सदस्यांचा संताप पाहून सभापती संजय पावशे यांनी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांना शासनदरबारी पाठविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगत हा प्रस्ताव त्वरित महासभेकडे पाठविण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com