कल्याण-डोंबिवलीत महावितरणाद्वारे संवाद मेळावा

रविंद्र खरात
गुरुवार, 27 जुलै 2017

या ग्राहक मेळाव्यात कल्याण पूर्व मधून 115 तक्रारी प्राप्त झाल्या , कल्याण पश्चिम 82 त्यातील 18 तक्रारीचा निपटारा करण्यात आला. डोंबिवली मधून 104 तक्रारी मधील 5 तक्रारी प्रलंबित आहेत, यात वीज बिल, नवीन वीज जोड़णी, सदोष मीटर, फ्यूज कॉल संबधी तक्रारी प्राप्त होत्या. प्रलंबित तक्रारी एक आठवड्यात निकाली काढण्यात येणार आहे.

कल्याण : महावितरणाद्वारे कल्याण व डोंबिवली या शहरात प्रत्येक पहिल्या व चौथ्या सोमवारी ग्राहक तक्रार निवारण व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून वीज ग्राहकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण कल्याण परिमंडळ उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी केले आहे. 

महावितरण कल्याण मंडळ 1 अंतर्गत कल्याण पूर्व पश्चिम आणि डोंबिवली विभाग अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण व संवाद मेळावा नुकताच कल्याण मध्ये संपन्न झाला. मेळाव्यात 301 ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या, त्यामधील 232 तक्रारी त्वरित निपटारा करण्यात आला तर 69 तक्रारी संपूर्ण तपासणी करून 7 दिवसात निकाली काढण्यात येणार आहे. 

या ग्राहक मेळाव्यात कल्याण पूर्व मधून 115 तक्रारी प्राप्त झाल्या , कल्याण पश्चिम 82 त्यातील 18 तक्रारीचा निपटारा करण्यात आला. डोंबिवली मधून 104 तक्रारी मधील 5 तक्रारी प्रलंबित आहेत, यात वीज बिल, नवीन वीज जोड़णी, सदोष मीटर, फ्यूज कॉल संबधी तक्रारी प्राप्त होत्या. प्रलंबित तक्रारी एक आठवड्यात निकाली काढण्यात येणार आहे.

या मेळाव्यामध्ये महावितरण कल्याण मंडळ 1 अधीक्षक अभियंता सुनील काकड़े, कल्याण पश्चिम कार्यकारी अभियंता डी डी राठोड, कल्याण पूर्व कार्यकारी अभियंता काशीनाथ बेळळे, डोंबिवली कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड आदी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Kalyan news mahavitran in kalyan