'...तर कल्याण परिवहन उपक्रमाचे खाजगीकरण करू'

रविंद्र खरात
बुधवार, 21 जून 2017

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) कारभारात सुधारणा झाली नाही आणि पुढील तीन महिन्यात उत्पन्न वाढले नाही तर केडीएमटीच्या खाजगीकरणाबाबत विचार करू, असा सूचना वजा इशारा कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केडीएमटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) कारभारात सुधारणा झाली नाही आणि पुढील तीन महिन्यात उत्पन्न वाढले नाही तर केडीएमटीच्या खाजगीकरणाबाबत विचार करू, असा सूचना वजा इशारा कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केडीएमटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला आहे.

आज (बुधवार) केडीएमटीच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये महापौर देवळेकर यांनी केडीएमटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना वजा इशारा दिला. एक जुलैपासून शंभर बसेस रस्त्यावर आणा, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा, आगामी तीन महिन्यात केडीएमटीचा कारभारात सुधारणा झाली नाही, तर केडीएमटीच्या खासगीकरणाचा विचार करू, असा सूचना वजा इशारा त्यांनी या बैठकीत दिला.

महापौर राजेंद्र देवळेकर यांचा केडीएमटी च्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला इशारा

  • एक जुलैपासून शंभर बसेस रस्त्यावर आल्या पाहिजेत
  • तीन महिन्यात उपन्न वाढले पाहिजे
  • कारभार सुधारला नाही तर नागरिकांसाठी केडीएमटी खासगीकरणाचा विचार करू

या बैठकीला शिवसेना पालिका गटनेते रमेश जाधव, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, मनसे गटनेता प्रकाश भोईर, नगरसेवक प्रकाश पेणकर आणि सर्व पक्षीय परिवहन समिती सदस्य आणि महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांची उपस्थिती होती. तब्बल दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत देवळेकर यांनी केडीएमटीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. "सकाळ'शी बोलताना ते म्हणले, "केडीएमटीचे कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी वर्गामुळे बसेस रस्त्यावर येत नाहीत. आता मात्र हे सहन केले जाणार नाही. सध्या प्रतिदिन 70 ते 80 बसेस रस्त्यावर येतात. त्याऐवजी एक जुलैपासून 100 पेक्षा जास्त बसेस रस्त्यावर आल्या पाहिजेत.'

"बंद केलेले मार्ग पुन्हा सुरु करा. एखादी बस खराब झाली तर सुट्टे पार्ट खरेदी करण्यासाठीच्या प्रक्रियेसाठीची नस्ती अनेक महिने लेखा विभागात फिरत राहते. हे टाळण्यासाठी वर्षभराची एकदाच निविदा काढा. कामचुकार अधिकारी-कर्मचारी वर्गाला घरचा रस्ता दाखवा' असे आदेशही महापौरांनी यावेळी केडीएमटी प्रशासनाला दिले. "आगामी तीन महिन्यात उपन्न वाढले नाही. नियोजन केले नाही, तर नागरिकांच्या सोयीसाठी आम्हाला वेगळा विचार करावा लागेल', असा सज्जड दम यावेळी महापौरांनी अधिकारी वर्गाला दिला. यावेळी केडीएमटीचा खर्च आणि उपन्न बाजूचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर जेथे रिक्षा आणि फेरिवाल्यांचा अडथळा येतो तेथे पालिका आणि वाहतूक पोलिस आणि आरटीओची मदत घेवून काम करा, काहीही करा. पण नागरिकांना सेवा द्या, उत्पन्न वाढीसाठी तोडगा काढा, यावेळी आदेश दिल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. यावेळी भोईर, जाधव, पेणकर यांनी उपन्न वाढीसाठी काही सूचना केल्या.  परिवहन विषयावर महत्वपूर्ण बैठकीत परिवहन समिती सभापती संजय पावशे हे गैरहजर राहिल्याने चांगलीच चर्चा रंगली मात्र बाहेर गावी गेल्याने ते उपस्थित राहू शकले नाही, अशी चर्चा परिवहन समिती सदस्यांमध्ये रंगली होती.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:
जिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
योगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी
कर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा
धोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड
रुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​
‘योगा’त रमले आयटीयन्स​
संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी
हीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी?​
#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद

Web Title: kalyan news marathi news kalyan dombiwali news kdmt