कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

मागील पाच दिवसांपासून कल्याण शहरात पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. कल्याण-भिवंडी रस्ता तसेच शीळ फाटा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूकीची कोंडी झाली आहे.

कल्याण - मागील पाच दिवसांपासून कल्याण शहरात पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. कल्याण-भिवंडी रस्ता तसेच शीळ फाटा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूकीची कोंडी झाली आहे.

कल्याण शहरातून ठाणे तसेच मुंबईला जोडणाऱ्या भिवंडी रस्त्याची पावसामुळे चाळण झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने सकाळी कामानिमित्त निघालेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. उलट्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांमुळे वाहतूकीच्या कोंडीत भर पडली. वाहतूक पोलिसही अपुऱ्या मनुष्यबळामुळे ठिकठिकाणाऱ्या कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमी पडत होते. कल्याण-डोंबिवलीमार्गे नवी मुंबई पनवेलला जोडणारा शीळ रस्ताही अनेक जागी पावसाने खराब झाला आहे. त्या रस्त्यावरही मागील एक तासापासून वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान कल्याण फाटा ते देसाई गावादरम्यान ठाणे पालिकेचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असल्याची माहिती ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.

Web Title: kalyan news marathi news maharashtra news rain monsoon