देशात सायबर साक्षरता वाढवण्याची गरज: वैदेही तामर

सुचिता करमरकर
मंगळवार, 11 जुलै 2017

इंटरनेट आणि त्याच्याशी संलग्न सुविधांचा वापर वाढत असताना देशात सायबर साक्षरता वाढवण्याची गरज असल्याचे मत सायबर तज्ज्ञ वैदेही सचिन तामर यांनी मांडले. प्रेस क्लब कल्याण आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कल्याण - इंटरनेट आणि त्याच्याशी संलग्न सुविधांचा वापर वाढत असताना देशात सायबर साक्षरता वाढवण्याची गरज असल्याचे मत सायबर तज्ज्ञ वैदेही सचिन तामर यांनी मांडले. प्रेस क्लब कल्याण आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

के एम अग्रवाल महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रोज हाताळत असलेल्या अनेक गॅझेटचा योग्य वापर कसा करायचा याची माहिती देण्यात आली. के. एम. अग्रवाल कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अनिता मन्ना, उप प्राचार्य डॉ. आर बी सिंग, कॉलेजचे विश्वस्त ओमप्रकाश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संगणक आणि इतर प्रणालींमुळे जग एका क्लिकवर आले आहे, मात्र याचा वापर तसेच गैरवापर याविषयातील जागृती गरजेची असल्याचे वैदेही सचिन यांनी सांगितले. जर देशान्तर सायबर हल्ला झाला तर आपली पीछेहाट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. सायबर हॅकींगचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता समजावून सांगताना त्यांनी हे हॅकींग सकारात्मक कामांसाठी असेल असे स्पष्ट केले. सायबर सुरक्षेबाबत जागरुकता दाखवणाऱ्या रेणूका यादव, रत्नेश सोनार, निलेश नाईक, प्रथमेश शर्मा आणि मयुरेश ठोंबरे या ५ विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची महत्वपूर्ण घोषणा वैदेही सचिन यांनी प्रेस क्लबच्या कार्यक्रमात केली.

Web Title: kalyan news marathi news sakal news cyber security