लोकलमधील जागेचा वादावरून डोळ्यात टाकली मिरचीपूड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

कल्याणः मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करताना प्रवाशांमधील भांडणं हे काही नवीन नाही. मात्र, कल्याण नजीक असलेल्या शहाड स्थानकात जागेवरून प्रवाशांमध्ये झालेला वाद विकोपाला गेला असून, मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास एका व्यक्तीने प्रवाशांच्या डोळ्यावर मिरचीची पूड फेकल्याची धक्कादायक घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दीपक गावडे (27) असे मिरचीपूड टाकणा-या तरुणाचे नाव आहे. टिटवाळा लोकलमधल्या काही प्रवाशांशी दीपक यांच्यासोबत जागेवरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात ठेवून वचपा काढण्यासाठी हे कृत्य केल्याचे दीपक याने मान्य केले. मंगळवारी दीपक हा शहाड रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उतरला. लोकलच्या गेटवरच वाद झालेले प्रवासी उभे असल्याचे त्याने पाहिले. लोकल पुढे निघताच फलाटावरून आरोपीने मिरचीची पूड प्रवाशांच्या दिशेने फेकली. यामुळे सात प्रवाशांच्या डोळ्याला आणि शरीराला जळजळ झाली. उपचारासाठी कल्याणमधील रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

Web Title: kalyan news mumbai local and Pepper poured in the eye