कल्याण पूर्वमधील नागरिक सुविधा केंद्रापासून वंचित

रविंद्र खरात
गुरुवार, 13 जुलै 2017

कल्याण पूर्वमध्ये पूर्वी केवळ पालिकेचे ड प्रभाग क्षेत्र कार्यालय होते , वाढती लोकसंख्या आणि 27 गावांचा समावेश पाहता पालिकेने प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे विभाजन करण्यात आले. कल्याण पूर्वमध्ये लोकग्राम च्या प्रवेश द्वारा जवळ नव्याने 4 / जे प्रभाग क्षेत्र कार्यालय बनविन्यात आले.

कल्याण : कल्याण पूर्वमध्ये वाढती लोकसंख्या आणि 27 गावांचा समावेश यामुळे पालिकेचे प्रभाग क्षेत्र कार्यालय विभाजन करत 1 जुलै 2016 पासून कल्याण पूर्वमध्ये 4 / जे प्रभाग क्षेत्र कार्यालय पालिकेने सुरु केले मात्र तब्बल एक वर्ष झाले मात्र तेथील नागरी सुविधा केंद्र सुरु न झाल्याने नागरिकांना मालमत्ता कर आणि पानी भरण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे.

कल्याण पूर्वमध्ये पूर्वी केवळ पालिकेचे ड प्रभाग क्षेत्र कार्यालय होते , वाढती लोकसंख्या आणि 27 गावांचा समावेश पाहता पालिकेने प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे विभाजन करण्यात आले. कल्याण पूर्वमध्ये लोकग्राम च्या प्रवेश द्वारा जवळ नव्याने 4 / जे प्रभाग क्षेत्र कार्यालय बनविन्यात आले. पालिका सूत्रा कडून मिळालेल्या माहिती नुसार या प्रभाग क्षेत्र कार्यालय अंतर्गत 13 वार्ड आहेत तर अंदाजे दीड लाख लोकसंख्या असून मालमत्ता 26 हजार 100 आहे. तर 31 हजार बिलांची संख्या आहे, प्रभाग क्षेत्र कार्यालय 1 जुलै 2016 रोजी सुरु झाल्याने नागरिकांच्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती.

मात्र काही दिवसातच कल्याण पूर्व मधील नागरिकांचे स्वप्न भंग झाला . तब्बल एक वर्ष झाले तरी त्या प्रभाग क्षेत्र कार्यालयच्या इमारत मध्ये नागरी सुविधा केंद्र सुरु न केल्याने नागरिकांना कल्याण पूर्व मधील ड प्रभाग क्षेत्र अथवा कल्याण पश्चिम मधील पालिका मुख्यालय मध्ये पाय पीट करत पाणी बिल आणि मालमत्ता कर भरावा लागत आहे. यामुळे प्रभाग क्षेत्र कार्यालय मध्ये नागरिकांना सुविधा मिळाव्या त्या सोबत अधिकारी कर्मचारी वर्गाला ही अधिकार मिळावे या मागणीला जोर धरु लागला आहे.

नव्याने 4 / जे प्रभाग क्षेत्र कार्यालय सुरु झाल्यावर प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून प्रकाश ढोले यांनी काम पाहिले त्यांनी मागील वर्ष भरात त्या प्रभाग क्षेत्र कार्यालय मध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी , सभापती आणि सभागृहाचे बांधकाम पूर्ण केले त्यांची प्रशासनाने बदली करत त्यांच्या जागी स्वाती गरुड़ यांची नेमणुक केली , 1जुलै 2017 रोजी गरुड़ यांना 25 हजार रूपयांची लाच घेताना अटक झाली होती , तब्बल 12 दिवस झाले तरी त्यांच्या जागी अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्याने त्या कार्यालय मधील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे . 

मागील 1 वर्षापूर्वी हे प्रभाग क्षेत्र कार्यालय सुरु झाले आहे , मालमत्ता कर आणि पाणी बिल किती झाले हे चौकशी करण्यासाठी जावे लागते , परत ते बिल रक्कम माहिती घेवून ड वार्ड किंवा पालिका मुख्यालय मध्ये जावून भरावे लागते , एकीकडे कल्याण पूर्व मध्ये मूलभूत सुविधाची बोंब असताना हा त्रास किती दिवस सहन करायचा असा सवाल स्थानिक महिला उर्मिला पराते यांनी केला आहे .

जे / 4 मधील नागरी सुविधा केंद्र मधील काम पूर्ण झाले असून लवकरच महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते उद्घाटन करून नागरिकांना सुविधा दिली जाईल . तांत्रिक अड़चन आणि प्रशासकीय मान्यतामुळे तेथील काम उशिरा सुरु झाल्याची माहिती पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Kalyan news municipal corporation ward office