कल्याण: मंडप पूजनाच्या निमित्ताने प्लॅस्टिक मुक्तीचा संकल्प

सुचिता करमरकर
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ज्या समाज प्रबोधनाच्या उद्देशाने करण्यात आली होती तोच उद्देश आजच्या बदलत्या काळातही मंडळाने कायम राखला आहे. सांस्कृतिक, समाजिक कार्यक्रमांबरोबरच आजच्या गरजांचा विचार करत मंडळाने आपले कार्यक्रम निश्चित केले आहेत. याचाच एक भाग म्हणून यावर्षी मंडळाने वृक्षारोपण विषयावरील कार्यक्रम आयोजित केला आहे.

कल्याण : 123 वर्षांची परंपरा असलेल्या कल्याणातील सुभेदार वाडा गणेशोत्सव मंडळाने आपल्या मंडप पूजेच्या निमित्ताने सकाळच्या प्लॅस्टिक विरोधी मोहिमेला पाठींबा दिला आहे. दुर्वांकुर मित्र मंडळ या उत्सवाचे व्यवस्थापन करत आहे. उत्सव काळात प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ज्या समाज प्रबोधनाच्या उद्देशाने करण्यात आली होती तोच उद्देश आजच्या बदलत्या काळातही मंडळाने कायम राखला आहे. सांस्कृतिक, समाजिक कार्यक्रमांबरोबरच आजच्या गरजांचा विचार करत मंडळाने आपले कार्यक्रम निश्चित केले आहेत. याचाच एक भाग म्हणून यावर्षी मंडळाने वृक्षारोपण विषयावरील कार्यक्रम आयोजित केला आहे. पर्यावरण दक्षता मंचाचे विद्याधर वालावलकर हा कार्यक्रम सादर करती. उत्सव काळात विविध कारणांसाठी प्लॅस्टिकचा अथवा प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होतो. हा वापर पुर्णपणे बंद करत सकाळच्या प्लॅस्टिक विरोधी मोहिमेला मंडळाने पाठींबा दिला आहे. मंडळात सादर होणाऱ्या कार्यक्रमादरम्यानही उपस्थितांना प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. 

गणेशोत्सव मंडळाचे संचालक मयुरेश आगलावे यांच्या हस्ते मंडप पूजनाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी दुर्वांकुर मित्र मंडळाचे संयोजक सचिन शेखदार, सचिव विनय चितळे, चंद्रकांत जोशी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Kalyan news plastic free campaign