कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक पोलिसांनी 20 रिक्षा केल्या जप्त

रविंद्र खरात 
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

कल्याण पश्चिम एसटी डेपोसमोर रिक्षा स्थानक मधून सायंकाळी प्रवास करताना अनेक प्रवासी वर्गाला वेठीस धरले जाते, वाढीव भाडे घेणे, चौथे सीट घेणे, प्रवासी वर्गाशी हुज्जत घालणे, गणवेश न घालणे आदी तक्रारी वाढल्या होत्या. पहाटे 3 ते सकाळी 8 आणि रात्री 9 ते पहाटे 3 पर्यंत त्या परिसरामध्ये वाहतूक पोलिस नसल्याने बेकायदेशीर रिक्षा ही येत होत्या.

कल्याण : कल्याण पश्चिम एसटी डेपो समोरील रिक्षा स्थानकामधून सायंकाळी प्रवासी वर्गाला काही रिक्षा चालक वेठीस धरत होते. अनेक रिक्षा चालकाकडे लायसन्स, परमिट नसताना व्यवसाय करण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याची दखल घेत कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या पथकाने शनिवारी रात्री 9 पासून रात्री उशिरा पर्यंत रिक्षा चालकांची झाडझडती घेतली. यावेळी कागदपत्र नसल्याचे समोर आल्या यावेळी 20 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

कल्याण पश्चिम एसटी डेपोसमोर रिक्षा स्थानक मधून सायंकाळी प्रवास करताना अनेक प्रवासी वर्गाला वेठीस धरले जाते, वाढीव भाडे घेणे, चौथे सीट घेणे, प्रवासी वर्गाशी हुज्जत घालणे, गणवेश न घालणे आदी तक्रारी वाढल्या होत्या. पहाटे 3 ते सकाळी 8 आणि रात्री 9 ते पहाटे 3 पर्यंत त्या परिसरामध्ये वाहतूक पोलिस नसल्याने बेकायदेशीर रिक्षा ही येत होत्या. यामुळे कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी शनिवारी रात्री 9 नंतर मध्यरात्रीपर्यंत एक विशेष मोहीम हाती घेतली. यामुळे रिक्षा चालकांची धाबे दणाणले होते. या कारवाईमध्ये 20 रिक्षा जप्त करण्यात आल्याने पुन्हा कल्याणमधील बेकायदा रिक्षा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे.

रिक्षा चालकांच्या विरोधात पाहता शनिवारी रात्री अचानक एसटी डेपो समोर रिक्षा चालकांची आमच्या पथकाने झाडाझडती घेतली अनेक जणांकडे कागदपत्रे अथवा लायसन्स नव्हते. यामुळे 20 रिक्षा जप्त केल्या आहेत. काहीनी कागदपत्र आज दाखविल्याने दंड आकारून सोडण्यात आले मात्र ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत, 16 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या रिक्षा भंगारात काढण्यात येणार असून महिन्यात प्रत्येक आठवड्यात पूर्व सूचना न देता ही कारवाई पुढील आदेश येई पर्यंत सुरू राहणार असल्याचे माहिती कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.

Web Title: Kalyan news police seized rickshaw