कल्याण रेल्वे स्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य

रविंद्र खरात
शनिवार, 29 जुलै 2017

कल्याण रेल्वे स्थानक महत्त्वाचे स्थानक असून, रेल्वे स्थानकाच्या बाहेर  रेल्वेच्या हद्दीत रिक्षा स्थानक आहे. तेथून उल्हासनगरमधील एक ते तीन नंबर, कल्याणमधील वालधुनी, रामबाग, सिंधीगेट, कल्याण आरटीओ, बिर्ला कॉलेज योगीधाम, शहाडला जाणाऱ्या रिक्षा थांबतात.

कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाचा जवळील रिक्षा स्थानक परिसरामध्ये पावसाने भले मोठी खड्डे पडली असून त्यामुळे पावसाच्या पाण्याने मोठी तळी निर्माण झाली आहेत. तर साठलेल्या पाण्यामधून वाट काढत प्रवासी वर्गाला रिक्षा पकडावी लागते, त्यामुळे रिक्षा चालकासहित नागरीक त्रस्त झाले आहेत.

कल्याण रेल्वे स्थानक महत्त्वाचे स्थानक असून, रेल्वे स्थानकाच्या बाहेर  रेल्वेच्या हद्दीत रिक्षा स्थानक आहे. तेथून उल्हासनगरमधील एक ते तीन नंबर, कल्याणमधील वालधुनी, रामबाग, सिंधीगेट, कल्याण आरटीओ, बिर्ला कॉलेज योगीधाम, शहाडला जाणाऱ्या रिक्षा थांबतात. सकाळी सायंकाळी प्रवासी रिक्षा पकडण्यासाठी येतात तर त्यांना पावसाच्या साठलेल्या पाण्यामधून वाट काढावी लागते. तर सायंकाळी प्रवाशांना मुसळधार पावसात साचलेल्या पाण्यात उभे राहत ताटकळत उभे राहवे लागते.

एकीकडे शहरात खड्डे मुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून रेल्वे स्टेशनमधील रिक्षा स्थानकात खड्डे आणि त्यात साचलेले पाणी, चिखल यामुळे माश्या आणि डासांमुळे रात्री त्रास होतोच तर दिवसाही त्रास होत असल्याने रिक्षा चालकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यामुळे प्रवासी वर्गात संतापचे वातावरण असून एखाद्या दिवशी उद्रेक झाल्यावर रिक्षा संघटना आणि रेल्वे प्रशासन जागे होणार का असा सवाल केला जात आहे.

हे रिक्षा स्थानक रेल्वे च्या हद्दीत असल्याने महानगर पालिका कडून तेथील समस्या दूर करू शकत नाही, रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पत्र व्यवहार करून ही रेल्वे प्रशासन या समस्यांकडे लक्ष्य देत नसल्याचा आरोप टॅक्सी रिक्षा महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी केला आहे.

पावसाळ्यामुळे रिक्षा स्थानक परिसर मध्ये खड्डे निर्माण होवून पावसाचे पाणी साचल्याने प्रवासी वर्गाला त्रास होत असल्याने त्वरित दुरुस्ती करावे असे संबधित विभागाला कळविले असल्याची माहिती कल्याण रेल्वे स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: kalyan news pot holes in kalyan