कल्याण: पादचारी पूल, रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या स्ट्रक्चर ऑडीटची मागणी

रविंद्र खरात
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

दरवर्षी रेल्वे स्थानकामधील पादचारी पुलांची स्ट्रक्चर ऑडीट करून आवश्यक ठिकाणी दुरुस्ती केली जाते. प्रवासी संघटनाकडे अतिरीक्त माहिती असल्यास त्यांनी द्यावी चौकशी करून तेथील दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

कल्याण : डोंबिवली ते कर्जत आणि डोंबिवली ते कसारा रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल आणि रेल्वे स्थानकांर्तगत असलेल्या पादचारी पुलाचे स्ट्रक्चर ऑडीट करण्याची मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते कसारा आणि डोंबिवली ते कर्जत रेल्वे मार्गावर रेल्वे आणि स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, रस्ते विकास महामंडळ, आणि एमएमआरडीच्या माध्यमातून उड्डाणपूल बनविले आहेत. कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी वर्गाने नुकताच पाहणी दौरा केला होता. त्यात अनेक ठिकाणी त्या पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी दिली.

अनेक ठिकाणी रेल्वे फाटक तेथे उड्डाणपूल बनविण्याचे काम करावे. जेथे रखड़ली त्याला गती द्यावी त्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत होणार नाही. जेथे फाटक बंद आहेत मात्र तेथून नागरीक ये जा करत असून तेथे अपघात झाल्याने रेल्वे सेवेवर परिणाम होतो. त्यामुळे तेथे रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांमार्फ़त तेथे कठोर कारवाई करावी. अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे.

दरवर्षी रेल्वे स्थानकामधील पादचारी पुलांची स्ट्रक्चर ऑडीट करून आवश्यक ठिकाणी दुरुस्ती केली जाते. प्रवासी संघटनाकडे अतिरीक्त माहिती असल्यास त्यांनी द्यावी चौकशी करून तेथील दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

डोंबिवली ते कर्जत, डोंबिवली ते कसारा दरम्यान रेल्वेने प्रति दिन लाखो प्रवासी प्रवास करत असतात त्यांना नेमकी क़ाय सुविधा मिळते. याबाबत प्रवासी संघटना पदाधिकारी वर्गाचा पाहणी दौरा झाला. यात रेल्वे स्थानकामधील पादचारी पुल आणि रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाची स्ट्रक्चर ऑडीट करून दुरुस्तीची काम हाती घ्यावी अशी मागणी रेल्वे प्रशासन कडे केली असल्याची माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी दिली.

Web Title: Kalyan news railway bridge structural audit