कल्याणः 36 तासानंतर रेल्वेसेवा पूर्वरत न झाल्याने जन जीवन विस्कळीत

रविंद्र खरात
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

कल्याण: तब्बल तीन दिवसानंतर ही टिटवाला ते कसारा दरम्यान लोकल रेल्वे सेवा पूर्वरत न झाल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून, ऐन गणेशोत्सव काळात दोन दोन दिवस घरी राहवे लागत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

कल्याण: तब्बल तीन दिवसानंतर ही टिटवाला ते कसारा दरम्यान लोकल रेल्वे सेवा पूर्वरत न झाल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून, ऐन गणेशोत्सव काळात दोन दोन दिवस घरी राहवे लागत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

कल्याणच्या पुढे टिटवाला, खडवली, आसनगाव, वासिंद, आटगाव, तानशेत, खर्डी, उंबरमाळी व कसारा आदी रेल्वे स्थानक आहेत. या परिसर मधील छोट्या मोठ्या गावामधील दूध विक्रेता, भाजीपाला विक्रेते, चाकरमानी, विद्यार्थी वर्ग रेल्वेच्या लोकलने प्रवास करतात. रेल्वे समांतर प्रवासी वाहतूक खर्चिक असल्याने बहुतांश नागरीक रेल्वेने प्रवास करत आहेत. मंगळवारी (ता. 29) सकाळी सहा साडे सहा वाजता आसनगाव आणि वासिंद रेल्वे स्थानक दरम्यान दुरान्तो एक्सप्रेस अपघात झाल्यावर टिटवाला पुढील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले.

अपघात झाल्यावर सरकारी यंत्रणेने मेलमध्ये अडकलेल्या नागरिकांना एसटी, खासगी बसेस, केडीएमटी बसेस, टैक्सी, रिक्षा उपलब्ध केल्या. मात्र, आसनगाव पुढील कसारा पर्यंत रेल्वे स्थानक मध्ये अडकलेल्या प्रवासी वर्गाकडे कोणी लक्ष्य दिलेच नाही. दुसऱ्या दिवशी न केडीएमटी न एसटी बस तिकडे फिरकली नसल्याने नागरिकांनी महामार्गाला येवून भेटल त्या वाहनाने कल्याण, टिटवाला, मुंबई गाठली. काहींनी घटनेची माहिती घेत घरीच राहणे पंसद केले. दुधविक्रेते, भाजीपाला विक्रेते यांना चांगलाच फटका बसला.

सध्या गणेशोत्सव असल्याने अनेक जण एकमेकांच्या घरी जात सण साजरा करतात. मात्र, लोकल बंद असल्याने पर्यायी प्रवासी वाहतूक खिशाला परवडणारी असल्याने घरी राहणे पंसद केले. तब्बल 36 तासानंतर बुधवारी सायंकाळी कसारा लोकल सुरु करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनने केला, मात्र तो अपयशी ठरला आहे. अपघात झालेल्या ठिकाणी रेल्वे रुळाखालील अडकलेली माती घातक असल्याने पुन्हा तांत्रिक काम सुरु झाले असून, केवळ मेल गाड्या धिम्या गतिने सुरु केल्या. तेथील नागरिकांना दिलासा न मिळाल्याने संतापाचे वातावरण आहे. अशा दुर्घटना झाल्यास ज्या सरकारी यंत्रणा पर्यायी प्रवासी वाहतुक वाहन सोडतात तशा प्रती दिन लोकल वरील ताण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासन आणि सरकारी यंत्रणा कल्याणच्या पुढील कसारा पर्यंतच्या नागरिकांना दिलासा देणार का? असा सवाल केला जात आहे.

प्रतिक्रिया-
दादरला कामाला असून प्रतिदिन आसनगाव वरुन 7 वाजून 58 मिनिटची लोकल पकडतो. मात्र, त्यादिवशी सकाळीच दुर्घटना झाल्याने मी घरीच राहिलो. आज तिसरा दिवस आहे, आज ही घरीच आहे. मुंबई गाठने खर्चिक दूसरीकडे मुंबईमध्ये ही पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, आजही रेल्वे सेवा पूर्वरत न झाल्याने आम्ही काय करायचे या महिन्यात दांडी झाल्यास पुढील महिन्यात पगार कमी येणार आम्ही जगायचे कसे? असा सवाल आसनगाव मधील नागरीक श्रीकांत उबाळे यांनी केला आहे.

आसनगाव येथे रेल्वे अपघात झाल्यावर रेल्वे सेवा पूर्वरत करण्यासाठी दोन दिवस अविरत काम करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता व ञाण शरिरात राहिला नसतानाही शेकडो रेल्वे कर्मचारी अधिकारी वर्ग काम करताहेत. दुसरा मार्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरू होण्यास वेळ जाईल. टिटवाळा ते आसनगाव शटल सेवा सुरू केली जाईल तर काही मेल गाड्या मधून प्रवास करण्यासाठी परवानगी दिली जाईल. रेल्वे सोबत अन्य प्रवासी वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
येथे 'बाबा'चे समर्थक रस्त्यावर; इतर देशांत बलात्काऱ्यांचे काय होते पाहा

'स्वाभिमानी शेतकरी' सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'
आणखी एक चांगला अधिकारी विदर्भात पळविला 
मुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू
पाचशे, हजाराच्या 99 टक्के नोटा बँकांमध्ये जमा 
मुंबईतील पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा सापडला मृतदेह
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पावसाळ्यातही किलबिलाट
कोयना धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीकडे
मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके पिछाडीवर
ठाणेदारांनी केला महिला पीएसआयविरोधात गुन्हा दाखल
सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतराची अनुभूती

Web Title: kalyan news railway issue and People life disorder