रेल्वे प्रवासात स्टंटबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

रविंद्र खरात
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत या परिसरामध्ये अनेक कॉलेज असून रेल्वे प्रवास करत कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून विद्यार्थी गर्दी नसलेल्या रेल्वे लोकल गाड़ीमध्ये प्रवास करताना दरवाजाच्या फुटबोर्डवर प्रवास करतात ,मोबाईलवर संभाषण करणे, काही जण तर स्टंटबाजी करीत असतात यामुळे अनेक अपघात होत आहेत.

कल्याण : रेल्वे प्रवासात अनेक कॉलेजचे विद्यार्थी मोबाईल वर बोलत लोकलमधील दरवाज्यात उभे राहून प्रवास करतात स्टंटबाजी करतात, रेल्वे रूळ क्रॉसिंग करतात त्यामुळे अनेक अपघात होत असून कॉलेज मध्ये रेल्वे सुरक्षित प्रवास बाबत विद्यार्थी वर्गात जनजागृती व्हावी यासाठी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने पुढकार घेतला असून जनजागृती नंतर दोषी विद्यार्थ्यांवर कॉलेज प्रशासनने कठोर कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनाने केली आहे. 

कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत या परिसरामध्ये अनेक कॉलेज असून रेल्वे प्रवास करत कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून विद्यार्थी गर्दी नसलेल्या रेल्वे लोकल गाड़ीमध्ये प्रवास करताना दरवाजाच्या फुटबोर्डवर प्रवास करतात ,मोबाईलवर संभाषण करणे, काही जण तर स्टंटबाजी करीत असतात यामुळे अनेक अपघात होत आहेत.

पालक वर्ग मोठ्या मेहनतीने त्यांच्या पाल्याला शिक्षणसाठी पाठवते मात्र अश्या अपघाताच्या घटनेने त्यांचे स्वप्न ही धुळीस मिळते. नियम मोडणाऱ्या विरोधात रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांनी धड़क मोहिम हाती घेतली आहे यात विद्यार्थी वर्गाची संख्या जास्त आहे. त्यांच्यावर कारवाई न करता आता रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस यांच्या सोबत कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सुरक्षेते बाबत प्रत्येक कॉलेजमध्ये जावून जनजागृती करण्यात येत असून तदनंतर जो विद्यार्थी स्टंटबाजी अथवा नियम मोडताना सापडेल. त्याला कॉलेज प्रशासन ने कॉलेजमधून 15 दिवस निलंबन करावे. त्यांच्या पालकाना कॉलेजमध्ये बोलावून ही गंभीर बाब लक्षात आणून द्यावे आणि कॉलेजमध्ये रेल्वे प्रवासामधील सुरक्षा बाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनानी केली आहे. आता कॉलेज प्रशासन क़ाय भूमिका घेतात याकडे लक्ष्य लागले आहे.

नियम बाहय रेल्वे प्रवास केल्याने अपघात घड़तात आणि त्यात जख्मी आणि मयतांची संख्या कॉलेज मधील विद्यार्थी वर्गाची संख्या वाढत आहे ते दुर्देवी आहे. या घटना कमी होण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्याच्या सुरक्षेबाबत जनजागृती करत आहोत अगोदर कॉलेजमध्ये जावून निवेदन देणे, पथनाट्य सादर करण्यात येत असून नियम तोडणाऱ्या विद्यार्थी वर्गावर कॉलेजने कारवाई केल्यास या घटना कमी होतील. यासाठी आम्ही प्रयन्त करत असल्याची माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी सकाळला दिली.

Web Title: Kalyan news railway passengers stunt